Join us  

Mom To Be! अनुष्काने ओढणीने लपवला बेबी बंप, विराट कोहलीबरोबरचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 10:54 AM

दुसऱ्यांदा आई होणार अनुष्का! ओढणीने बेबी बंप लपवताना दिसली अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा रंगल्या आहेत. अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, याबाबत अनुष्का किंवा विराटने कोणतंही भाष्य केलं नव्हतं. यादरम्यानच अनुष्काचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत असल्याने ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं कन्फर्म झालं होतं. आता अनुष्काचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये अनुष्का बेबी बंप लपवताना दिसत आहे.  

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन अनुष्का आणि विराट कोहलीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अनुष्काने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. या व्हिडिओत अनुष्काचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. ओढणीने अनुष्का बेबी बंप लपवत असल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. अनुष्का-विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. "ती बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करतेय", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "त्यांच्या चालण्यावरुनच कळतंय...गुड न्यूज कन्फर्म आहे," असं म्हटलं आहे. अनेकांनी अनुष्का आणि विराटचं अभिनंदन केलं आहे. 

अनुष्का आणि विराट लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. २०१७ मध्ये लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. २०२१मध्ये त्यांना वामिका ही मुलगी झाली. विराट-अनुष्का वामिकाला मीडियापासून दूर ठेवणं पसंत करतात. त्यांनी आजपर्यंत तिला कॅमेरासमोर आणलेलं नाही. आता ते पुन्हा आईबाबा होणार आहेत.  

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीसेलिब्रिटी