Join us  

लंडनमध्ये पुन्हा एकदा भक्तीत तल्लीन झाले अनुष्का-विराट, चाहते म्हणताहेत - भारतात कधी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 1:15 PM

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) सध्या लंडनमध्ये असून कुटुंबासोबत टाइम स्पेंड करत आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) सध्या लंडनमध्ये असून कुटुंबासोबत टाइम स्पेंड करत आहेत. अनुष्का आणि विराट भारत सोडून मुलांसह कायमचे लंडनला शिफ्ट झाल्याच्या चर्चा आहेत. मात्र आतापर्यंत या स्टार कपलने याबाबत मौन बाळगले आहे. लंडनला शिफ्ट होण्याच्या अफवांच्या दरम्यान पुन्हा एकदा दोघेही परदेशात भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसले. 'विरूष्का'(Virushka)चा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यानंतर चाहते विचारत आहेत की तुम्ही भारतात परत कधी येणार आहात.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा लंडनमधील युनियन चॅपलमध्ये कृष्ण दास यांच्या कीर्तनात सहभागी झाले होते. दोघेही एकत्र बसून कृष्णदास लक्षपूर्वक ऐकत आहेत. बरेच लोक कृष्ण दास यांना योगाचा रॉक स्टार देखील म्हणतात. ते आधुनिक संगीतासह पारंपारिक भारतीय मंत्रोच्चाराची सांगड घालताना दिसतात.

अनुष्का आणि विराट लंडनमध्ये कीर्तनात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या महिन्याच्या सुरुवातीलाही, दोघे कृष्ण दास सभेला उपस्थित असताना इतर भक्तांसोबत 'श्री राम, जय राम' म्हणताना दिसले. नंतर अनुष्काने कीर्तनाचे फोटोदेखील शेअर केली आणि त्यांच्या पोस्टमध्ये कृष्णा दास यांना टॅग केले. मात्र, या व्हिडीओनंतर अनुष्का आणि विराटचे काही चाहते भारतात परतणार कधी असा सवाल करत आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ जुन्या घटनेचा असल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे.

सामान्य जीवन जगण्यासाठी विराट आणि अनुष्का त्यांची मुले वामिका आणि अकाय यांच्यासह लंडनला शिफ्ट झाल्याच्या बातम्या आहेत. विशेषत: अनुष्का आपल्या मुलांसह लंडनमध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळे या चर्चा वारंवार होताना दिसत आहे. विराट अनेकदा लंडनमध्ये दिसला आहे. अलीकडेच, भारताच्या टी २० विश्वचषक विजयाचे सेलिब्रेशन केल्यानंतर विराट भारतातून लंडनला परतला होता.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली