अनुष्का शर्माने केली दीपिकाची कॉपी,लग्नात घातले सेम टु सेम झुमके!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 7:05 AM
बॉलिवूड सेलिब्रेटी नेहमीच आपल्या लूकबाबत सजग असतात.कोणत्याही कार्यक्रमात आपलाच स्टायलिश लूक लक्षवेधी ठरावा याच्याच प्रयत्नात दिसतात.मात्र कधी कधी हटके ...
बॉलिवूड सेलिब्रेटी नेहमीच आपल्या लूकबाबत सजग असतात.कोणत्याही कार्यक्रमात आपलाच स्टायलिश लूक लक्षवेधी ठरावा याच्याच प्रयत्नात दिसतात.मात्र कधी कधी हटके स्टाइल करण्याच्या नादात त्या कोणत्या दुस-या सेलिब्रेटीच्या स्टायलिश लूकचीही कॉपी करताना दिसतात.अनेकदा हॉलिवूड अॅक्ट्रेसच्या ड्रेसिंग स्टाइल कॉपी करत विविध सोहळ्यात हजेरी लावणारे असे अनेक सेलिब्रेटी दिसतात.इतरांची ड्रेसिंग स्टाइल असो किंवा मग हेअर स्टाइल कॉपी करत अगदी तसाच लूकची पसंती मिळवत सा-यांच्या नजरा आकर्षित करण्याचा त्यांचा फंडा असतो.आता आणखीन एक अभिनेत्री कॉपीकॅटच्या लिस्टमध्ये सामिल झाली आहे.आणि ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे नयी नवेली दुल्हन अनुष्का शर्मा. होय, दीपिकाची सध्या पदमावती सिनेमामुळे तुफान चर्चा आहे.तिचं हसणं, बोलणं, तिची स्टाइल सगळ्या गोष्टी रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.त्यामुळे अगदी त्याचप्रमाणे दीपिकाची कॉपी करण्याचा अनुष्का शर्माने तिच्या लग्नात केलेला या प्रयत्नाची आता पोलखोल झाली आहे.फोटोत दिसत असल्याप्रमाणे दीपिका पादुकोणने कानात घातलेले झुमके आणि अनुष्काने तिच्या लग्नात घातलेले झुमके अगदी सेम टु सेम आहेत.दीपिकाने ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या 'जिओ मराठी फिल्मफेअर अवॉर्डस्'मध्ये हे झुमके घातले होते.इतकंच नाहीतर अनुष्काने यावेळी घातलेला लेहंगा बरोबर दुपट्टाही पदमावती स्टाइलनेच नेसल्याचे पाहायला मिळतंय.त्यामुळे दीपिकाचा फिव्हर अनुष्कावरही चढलेला पाहायला मिळतोय.(Wedding Album:साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत असा होता 'विरुष्का'चा अंदाज!)लग्नाआधी विराट व अनुष्काची रिंग सेरेमनी झाली.यावेळी विराट व अनुष्का दोघांनीही एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घातली.या रिंगसेरेमनीबद्दलची एक खास बातमी आहे. होय, विराटने अनुष्काच्या हातात घातलेली अंगठी साधीसुधी नव्हती तर हि-याची होती.अनुष्कासाठी ही अंगठी शोधण्यात विराटने तीन महिने घालवले. अखेर आॅस्ट्रियात त्याला एक अंगठी पसंत पडली. आॅस्ट्रियाच्या डिझाईनरने डिझाईन केलेल्या या अंगठीचे वैशिष्ट्य म्हणजे, ती प्रत्येक अँगलने बघितल्यास वेगवेगळी दिसते. या अंगठीवर विराटने १ कोटींपेक्षा अधिक खर्च केला आहे.अनुष्काने लग्नात घातलेला लेहंगा आणि दागिनेही असेच खास होते.अनुष्काचा लहंगा सब्यसाची यांनी डिझाईन केला होता. ६७ कारागिरांनी ३२ दिवस खपून तो तयार केला. पिंक कलरच्या या लहंग्यावर हाताने खास कढाई वर्क केले गेले होते.