Join us

अनुष्का शर्माचे ‘हे’ रूप पाहून अंगावर येतील शहारे! पाहा, ‘परी’चा घाबरवणारा टीजर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 5:34 AM

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने ‘परी’ या तिच्या आगामी चित्रपटाचा नवा टीजर रिलीज केला.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने  ‘परी’ या तिच्या आगामी चित्रपटाचा नवा टीजर रिलीज केला. अर्थात ही ‘परी’ आपल्या आत्तापर्यंतच्या कल्पनेपासून वेगळी आहे. होय, या ‘परी’चा लूक काहीसा भयावह आहे. अनुष्काने ‘परी’चा हा घाबरवणारा लूक जारी करताना ‘स्वीट ड्रीम्स’ असे लिहिलेय.अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर जारी केलेल्या ‘परी’च्या टीजरमध्ये एकही संवाद नाही. केवळ शून्यात पाहणारी अनुष्का आणि पार्श्वसंगीत एवढेच आल्याला दिसते. काही क्षणात या अनुष्काच्या चेह-यावरून रक्त ओघळू लागले. डोळे रक्तासारखे लाल होतात. चेहºयावर सर्वत्र नखांचे ओरखडे आणि जखमा दिसायला लागतात.अनुष्काचा हा लूक काही क्षणांसाठी स्तब्ध करतो.  हा टीजर पाहिल्यानंतर ‘परी’बद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचते.टीजरच्या शेवटी चित्रपटाची रिलीज बदललेली डेटही दिसते. बदललेली यासाठी की, आधी हा चित्रपट ९ फेबु्रवारीला रिलीज होणार होता. आता तो २ मार्चला रिलीज होणार आहे. अनुष्का या चित्रपटाची को-प्रोड्यूसर आहे. अनुष्का तिचा भाऊ करनेश शर्मासोबत मिळून हा चित्रपट बनवते आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. बंगाली स्टार परमब्रता चॅटर्जी यात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. यापूर्वी अनुष्का निर्मित ‘एनएच१०’ आणि ‘फिल्लोरी’ हे दोन चित्रपट आपण पाहिलेत.   या दोन्ही चित्रपटांना पे्रक्षक व समीक्षकांची दाद मिळाली. आता अनुष्काच्या होम प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमा  ‘परी’कडूनही प्रेक्षकांना बºयाच अपेक्षा आहेत. अनुष्का या अपेक्षांवर किती खरी उतरते तेही आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. तूर्तास अनुष्का ‘परी’च्या शूटींगसोबतच आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटाच्या शूटींगमध्येही व्यस्त आहे. यात ती शाहरूख खान आणि कॅटरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या संजय दत्तच्या बायोपिकमध्येही अनुष्का  एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. गत डिसेंबर महिन्यात अनुष्काने क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केले. ‘परी’हा अनुष्काचा लग्नानंतरचा प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट असणार आहे.ALSO READ : विराट-अनुष्काने केली 'ही' चूक, कदाचित पुन्हा करावे लागणार लग्न !