Join us

रक्तपात आणि सस्पेन्सने परिपूर्ण अशी अनुष्का शर्माची वेबसीरिज 'पाताल लोक', पहा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 5:01 PM

'पाताल लोक'च्या ट्रेलरला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती असलेली नवीन सीरिज लवकरच अॅमेझॉन प्राइमवर दाखल होणार आहे. या सीरिजचे नाव 'पाताल लोक' असे आहे. नुकताच अनुष्काने त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच केला आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 मे रोजी लाँच होणार आहे. 

'पाताल लोक'चा ट्रेलर पाहून हे लक्षात येत आहे की, ही एक डार्क क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे. ट्रेलरची सुरुवात एका मोनोलॉगनं होताना दिसते. या जगाचे तीन भाग सांगण्यात आले आहेत. एक स्वर्ग लोक, एक धरती लोक आणि एक पाताल लोक जिथे किडे राहतात असं या मोनोलॉगमध्ये सांगण्यात आलं आहे. यावरून कथेचा काहीसा अंदाज येत आहे.

सुदीप शर्मा निर्मित पाताल लोक 15 मे रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओजवर रिलीज होणार आहे. सुदीप शर्माने याआधी उडता पंजाब आणि एनएच 10 असे सिनेमे लिहले आहेत. याचे दोन डायरेक्टर आहेत. एक आहे अविनाश अरूण आणि प्रोसित रॉय. दृश्यम हा सिनेमा अविनाशने दिग्दर्शित केला आहे तर परी हा सिनेमा प्रोसितनं डायरेक्ट केला आहे. जयदीप अहलावतनं हाथीरामची भूमिका साकारली आहे तर नीरज कबी संजीव मेहाराची भूमिका साकारली आहे. गुल पनाग, जगदीत संधु, विपीन शर्मा, अभिषेक बॅनर्जी हे देखील यात काम करताना दिसणार आहेत.

पाताल लोक ही सीरिज अनुष्का शर्माच्या क्लीन स्लेट फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत तयार करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये जगाचा माहिती नसलेला आणि भयानक चेहरा दाखवण्यात येणार आहे.अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती झिरो चित्रपटात पहायला मिळाली. यात तिच्यासोबत शाहरूख खान व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :अनुष्का शर्मा