अनुष्का शेट्टीच्या 'भागमती'चा ट्रेलर आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 10:56 AM
बाहुबली फेम अनुष्का शेट्टीचा आगामी चित्रपट 'भागमती' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भागमतीमध्ये ती आईएएस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. जी गरिबांची मदत करते.
बाहुबली फेम अनुष्का शेट्टीचा आगामी चित्रपट 'भागमती' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भागमतीमध्ये ती आईएएस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. जी गरिबांची मदत करते. मात्र कोणत्या तरी कारणांमुळे तिच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ येते. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय दमदार आहे तसेच अनुष्काचा अभिनय सुद्धा तितकाच उत्कृष्ठ आहे. ट्रेलरच्या एका सीनमध्ये ती स्वत:च्या हातात खिळ ठोकताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक करतायेत. भागमती हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात भागमतीच्या अपोझिट उन्नी मुकुंदनला घेण्यात आले आहे. चित्रपटात मल्याळम अभिनेता जयराम सुद्धा दिसणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत रिलीज करण्यात येणार आहे. हा बिग बजेट चित्रपट आहे. बाहुबलीनंतर अनुष्का पहिल्यांदाच स्क्रिनवर दिसणार आहे. 26 जानेवारी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयच्या पॅडमॅन आणि दीपिका पादुकोणच्या 'पद्मावत' चित्रपटाबरोबर भागमतीचा बॉक्स ऑफिसवर सामना होणार आहे. गत वर्षी करण जोहरने अनुष्का शेट्टीला आपल्या चित्रपटात साईन करण्याची इच्छ व्यक्त केली होती. मात्र तिने मानधनाचा इतका मोठा आकडा समोर केला की, करणलाच घाम सुटला. अनुष्काने बॉलिवूड चित्रपटाला नकार देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनुष्काने इम्तियाज अलीच्या ‘तमाशा’ला नकार दिला होता. तिच्या नकारानंतर या चित्रपटात दीपिका पादुकोणची वर्णी लागली होती. याशिवाय अजय देवगणचा ‘सिंघम’ आणि ‘गोलमाल’ सारख्या चित्रपटांनाही अनुष्काने ‘ना’ म्हटले आहे. ALSO READ : OMG! प्रभासबद्दल पसेसिव्ह झालीयं अनुष्का शेट्टी! वाचा, ताजी बातमी!!‘बाहुबली2’नंतर प्रभास व अनुष्काच्या लिंकअपच्या बातम्या पसरल्या होत्या. या बातम्या अद्यापही थांबलेल्या नाहीत. दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. प्रभासच्या वाढदिवसाला अनुष्काने एक डिझाईनर मनगटी घड्याळ भेट दिले होते. कारण प्रभासला घड्याळांची प्रचंड आवड आहे. याबाबत तो अगदी क्रेझी आहे तर त्यानंतर आलेल्या अनुष्काच्या बर्थ डेला प्रभासने एक महागडी गाडी गिफ्ट म्हणून दिली होती. त्यानंतर साऊथच्या इंडस्ट्रित अनेक दिवस या कारची चर्चा रंगली होती.