प्रसिद्ध गायक आणि रॅपर एपी ढिल्लॉन याच्यावरील 'एपी ढिल्लन: फर्स्ट ऑफ अ काइंड' डॉक्युमेंटरीचं स्क्रिनिंग बुधवारी मुंबईत पार पडले. जिथे बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने धमाकेदार एन्ट्री केली.रणवीर सिंगही तेथे पोहोचला. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. याच दरम्यानच्या आणखी एक फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते म्हणजे एपी ढिल्लॉ आणि अभिनेत्री बनिता संधूच्या फोटोंनी. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या अफेरची जोरदार चर्चा आहे.
अलीकडेच अभिनेत्रीने एपी ढिल्लॉनसोबत लीपलॉक करताना छोटासा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर सगळ्यांचा भुवया उंचावल्या होत्या. आणि ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. अलीकडेच दोघे एका म्युझिक व्हिडीओमध्ये सुद्धा एकत्र दिसले होते.
यानंतर आता दोघे एपी ढिल्लॉन: फर्स्ट ऑफ अ काइंडचे स्क्रीनिंगला एकत्र दिसले. या वेबसिरीजचं प्रीमियर 18 ऑगस्ट Amazon होणार आहे. यात एपीचा आंतरराष्ट्रीय आयकॉन बनवण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्या आला आहे. या स्क्रिनिंगला सलमान खान, रणवीर सिंग, मृणाल ठाकूर, एमसी स्टेन इत्यादी अनेक कलाकार उपस्थित होते. बनिता लाल स्ट्रॅपी ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.
प्रीमियरमधील कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच, चाहत्यांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे. दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते त्यांचं कौतुक करतायेत.ब्रिटिश अभिनेत्री बनिता सिंधूने 2018 मध्ये शूजित सरकार यांच्या 'ऑक्टोबर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती विकी कौशलसोबत सरदार उधम सिंग या चित्रपटात झळकली होती.