श्रद्धा कपरच्या (Shraddha Kapoor) 'स्त्री 2' (Stree 2) सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. 2018 साली आलेल्या 'स्त्री' या हॉरर कॉमेडी सिनेमाचा हा सीक्वेल आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावची जबरदस्त केमिस्ट्री, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जीची कॉमेडी या मुळे प्रेक्षकांना सिनेमाने खिळवून ठेवलं. मात्र 'स्त्री 2' ला मिळत असलेल्या या यशाचं सगळं श्रेय श्रद्धा कपूरच घेऊन जात आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. यावर अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) काय म्हणाला वाचा.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत अपारशक्ती खुराना म्हणाला, "मी यावर काहीच बोलणार नाही. बोलायला गेलो तर मग बोलणं वाढतच जाईल. तुम्हाला सगळ्यांनाच वास्तव माहित आहे. मला काहीच बोलायचं नाही. जे प्रेक्षक बोलतील तेच खरं. जर त्यांना वाटतं हे योग्य आहे तर ठिके. जर त्यांना वाटतं की हा सर्वांचा सिनेमा आहे तर सगळ्यांचा आहे. जर प्रेक्षकांना सिनेमा चांगला वाटला नाही तर तो वाईट आहे."
तो पुढे म्हणाला, "सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. आम्ही सगळेच आनंदी आहोत. आनंद दाखवण्याता माझा काही वेगळा मार्ग नाही. मला कोणाच्याच भावना दुखवायच्या नाहीत. हा एक पीआर गेम आहे. मला यावर कमेंट करायची इच्छा नाही. प्रत्येक कलाकाराचा आपला प्रवास असतो. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. खऱ्या प्रेक्षकांचंही हेच मत आहे का मला जाणून घ्यायचं आहे. हा पीआर गेम आहे त्यामुळे मला यावर काहीही कमेंट करायची नाही. "
'स्त्री 2' ने आतापर्यंत वर्ल्डवाईड 500 कोटींची कमाई केली आहे. फक्त देशात ३०० कोटींचा आकडा पार केला आहे. यावर्षीचा हा सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे.