Join us

ठोको ताली... इकडं सिद्धूंचा राजीनामा अन् तिकडं अर्चना पुरणसिंगचा ट्रेंड सुरू झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 5:07 PM

नवज्योतसिंग सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर सिद्धू यांचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यानंतर, काही वेळातच अभिनेत्री आणि कपिल शर्मा शोमध्ये नवज्योतसिंह सिद्धू यांची खुर्ची सांभाळणाऱ्या अर्चना पुरणसिंग यांनाही नेटीझन्सने ट्रेंड करायला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देत्या आधीच सिद्धूंनी राजीनामा दिल्याने आता सारे लक्ष अमरिंदर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. तर, ट्विटरवर अर्चना पुरणसिंग यांचा ट्रेंड सुरू झाला आहे. 

मुंबई - पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंडखोरी करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद पटकाविणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंनी पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. दुसरीकडे अमरिंदर थोड्याच वेळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्या आधीच सिद्धूंनी राजीनामा दिल्याने आता सारे लक्ष अमरिंदर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. तर, ट्विटरवर अर्चना पुरणसिंग यांचा ट्रेंड सुरू झाला आहे. 

नवज्योतसिंग सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर सिद्धू यांचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यानंतर, काही वेळातच अभिनेत्री आणि कपिल शर्मा शोमध्ये नवज्योतसिंह सिद्धू यांची खुर्ची सांभाळणाऱ्या अर्चना पुरणसिंग यांनाही नेटीझन्सने ट्रेंड करायला सुरुवात केली आहे. सिद्धूंच्या राजीनाम्यामुळे आता अर्चना यांची खुर्ची धोक्यात आल्याचं अनेकांनी म्हटलंय. विशेष म्हणजे, यासंदर्भातील अनेक मिम्सही ट्विट होत आहेत. अर्चना या कपिल शर्मा शो या कॉमेडी शोमध्ये पूर्वी सिद्धू ज्या खुर्चीवर बसायचे, तेथे बसत आहेत. अनेकदा कपिलही त्यांना या खुर्चीवरुन टोला लगावत असतो. मात्र, सिद्धूंच्या राजीनाम्यामुळे पुन्हा खुर्चीचा विषय चर्चेत

 आला आहे.   

 

सिद्ंधूनीच काढली कॅप्टनची विकेट

देशभरात भाजपाचा झंझावात सुरु असताना एकहाती पंजाबची सत्ता खेचून आणणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंगांना (Amarinder Singh) काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढून टाकले. भाजपातील वादावरून काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांची विकेट काढली. त्यामुळे नाराज झालेले व दिवंगत राजीव गांधी यांचे मित्र असलेले कॅप्टन अमरिंदर यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. सुत्रांनुसार कॅप्टन दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी (Amit Shah) चर्चा करणार आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून भाजपच्या मुख्यालयात मात्र जोरदार हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे. 

म्हणून राजीनामा दिला - सिद्धू

या घडामोडींनंतर सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये सिद्धू यांनी म्हटले आहे की, मी पंजाबचे भविष्य आणि पंजाब कल्याणाच्या अजेंड्यासोबत समझोता करू शकत नाही. त्यामुळे मी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देत आहे. 

टॅग्स :काँग्रेसनवज्योतसिंग सिद्धूकपिल शर्मा अर्चना पूरण सिंग