Join us

मलायका-अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांवर अरबाजने दिली होती 'ही' प्रतिक्रिया; जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:04 AM

Arbaaz khan: अरबाजने शूरा खानसोबत लग्न केल्यानंतर त्याची आणि एक्स वाइफ मलायका अरोरा हिची चर्चा होऊ लागली आहे.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (arbaaz khan) याने नुकतीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. शूरा खान हिच्यासोबत अरबाजने निकाह केला आहे. त्यामुळे सध्या अरबाज सातत्याने चर्चेत येत आहे. त्याच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहे. इतकंच नाही तर त्याच्यामुळे मलायका अरोरा (malaika arora) आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) ही जोडी सुद्धा चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर अरबाजचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात अरबाजने मलायका-अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर अरबाजचा २०१९ मधला एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका सिनेमाचं प्रमोशन करत होता. या प्रमोशन दरम्यान एका पत्रकाराने त्याला मलायका-अर्जुनच्या लग्नासंबंधित प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर अरबाजने चांगलंच फिरवून फिरवून दिलं होतं.

त्या काळात अर्जुन आणि मलायका यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. अनेक अफवाही पसरल्या होत्या. या संदर्भात अरबाजला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, तू खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. पण, रात्रभर तू या प्रश्नासाठी विचार करत बसला असशील. चला खाऊ-पिऊयात. लंच टाइम झालाय. पाजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मला. पण, हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही इतका वेळ घेतला. मग मला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी विचार तर करावाच लागेल ना. मला पण थोडा वेळ द्या. मी उद्या याचं उत्तर देऊ चालेल?, असं भन्नाट उत्तर अरबाजने दिलं.

दरम्यान, अरबाजने दिलेल्या या उत्तरामुळे सगळीकडे एकच हाशा पिकला. सध्या अरबाज त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत येत आहे. नुकतीच त्याने शूरा खान सोबत लग्न केलं आहे. या लग्नाला अरबाजचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. यात त्याचा मुलगा अरहान सुद्धा हजर असल्याचं पाहायला मिळालं. 

टॅग्स :अरबाज खानमलायका अरोराअर्जुन कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी