Join us

अरबाजन खानने गर्लफ्रेंडसाठी केले असे काही, वाचून मलायका होईल Jealous!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 6:00 AM

अभिनेता अरबाज खान व मलायका अरोरा यांचे नाते मे २०१७ संपले आणि मग..

अभिनेता अरबाज खानमलायका अरोरा यांचे नाते मे २०१७ संपले. १९ वर्षे एकत्र संसार केल्यावर एका वळणावर अचानक अरबाज व मलायकाने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे कायदेशीर मार्गाने घटस्फोटही घेतला. आता दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे.

काही दिवसांपूर्वी अरबाजने लग्नाचे संकेत दिले होते. कदाचित हा त्याचाच पुरावा असावा. जॉर्जिया वेलकम टू बजरंगपूर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या सिनेमाची घोषणा झाल्या त्यावेळी अरबाज खानसुद्धा उपस्थित होता. त्यामुळे हा फोटो त्याचा पुरावा आहे. काही दिवसांपूर्वी  याआधी जॉर्जिया सलमान खानच्या 'दबंग 3'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशी चर्चा होती. मात्र त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. 

मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये पाहिले जाते. जॉर्जियाचे नाव फॅशन जगतात खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता ती तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. या वेबसीरिजचे नाव आहे करोलिन कामाक्षी. या सीरिजमध्ये करोलिनची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.  

टॅग्स :अरबाज खानमलायका अरोरा