Join us  

"मला सलमानशी लग्न करायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 9:42 AM

भाईजानच्या एका चाहतीने थेट त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या चाहतीला अरबाजने भन्नाट रिप्लाय केला आहे. 

बॉलिवूडमध्ये खान ब्रदर्सला कोण ओळखत नाही. भाईजान सलमान खानप्रमाणेच अरबाज आणि सोहेलदेखील बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. वयाची ६० गाठत आलेल्या सलमानचं लग्न कधी होणार? असा प्रश्न कायमच त्याच्या चाहत्यांना पडतो. अनेकदा सलमानला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला गेला आहे. पण, त्याचं समाधानकारक उत्तर काही चाहत्यांना मिळालेलं नाही. आता भाईजानच्या एका चाहतीने थेट त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या चाहतीला अरबाजने भन्नाट रिप्लाय केला आहे. 

अरबाज खानने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अरबाजने उत्तरं दिली. सलमानच्या एका चाहतीने अरबाजला "मला तुझ्या मोठ्या भावाची पत्नी व्हायचं आहे" असं विचारलं होतं. अरबाजने सलमानच्या चाहतीला हटके उत्तर दिलं आहे. "मी काय बोलू शकतो? लगे रहो मुन्नाभाई" असा रिप्लाय अरबाजने दिलं आहे. 

याबरोबरच अरबाजला चाहत्यांनी त्याची पत्नी शूरा हिच्याबाबतही प्रश्न विचारले. "शूरा काय चांगलं बनवते?" असा प्रश्न अरबाजला विचारला. यावर तो उत्तर देत म्हणाला, "ती मटण बिर्याणी छान बनवते". एका चाहत्याने अरबाजला "पुढचं लग्न?" असा प्रश्नही विचारला होता. यावर त्याने "बस हो गया भाई" असं म्हणत हसण्याचे इमोजी पोस्ट केले. 

दरम्यान, अरबाज खानने १९९८ साली मलायका अरोरासोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर १९ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने गेल्याच वर्षी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :सलमान खानअरबाज खान