सध्या कलाविश्वात सुरु असलेला हॉट टॉपिक म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (arjun kapoor) यांचं लग्न. गेल्या ५ वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे ही जोडी लग्नगाठ कधी बांधणार हा एकच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. एकीकडे अर्जुन आणि मलायकाचं (malaika arora) एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. तर, दुसरीकडे अरबाज (arbaaz khan) आणि मलायका यांच्यात अजूनही छान नातं आहे. या नात्याविषयी अरबाजने अलिकडे एका मुलाखतीत भाष्य केलं.
सिद्धार्थ कन्ननसोबत झालेल्या मुलाखतीत अरबाजने घटस्फोटानंतर मलायकासोबतचं नातं कसं आहे हे त्याने सांगितलं. घटस्फोटानंतर मलायका अरोरासोबत त्याचे नातं कसं आहे? असा प्रश्न अरबाजला विचारण्यात आला. यावर "आम्हाला एक मुलगा आहे. त्यामुळे आमची मानसिक स्थिती स्थीर ठेवणं गरजेचं आहे. आम्ही कायमच एकमेकांशी मैत्रीपूर्ण वागतो. गेल्या वर्षी तर आमच्यातील समंजसपणा आणखी वाढला आहे. आम्ही एकमेकांना अधिक समजून घेत आहोत", असं अरबाज म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "आयुष्यात आपल्याला पुढे जायचं आहे. माझ्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तिने स्विकारल्या. आणि मीदेखील तिच्या काही गोष्टींचा स्वीकार केला. मलायका अनेक गोष्टींमध्ये परिपक्व विचारांची आहे. सुदैवाने आम्ही कायमच एकमेकांच्या आवडीनिवडी, निर्णय याचा आदर करत एकत्र राहिलो."
दरम्यान, अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाल्यावरही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. आजही हे दोघ एकमेकांसोबत डिनर वा लंच डेटला जातात. १९९८ मध्ये मलायका-अरबाजने लग्न केलं होतं. मात्र, १८ वर्षानंतर ते विभक्त झाले. २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर, अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.