सलमान खानच्या फॅन्ससाठी 2019 हे वर्ष खूप स्पेशल असणार आहे. त्याला कारणही तसेच आहे यावर्षी अखेरीस सलमानचा मल्टीस्टारर 'भारत' सिनेमा रिलीज होणार आहे आणि दबंग तिसऱ्या भागाची शूटिंग सुरु आहे. सलमानचा भाऊ अरबाज खानने स्वत: ही गोष्ट कन्फर्म केली.
सिनेमाला घेऊन अरबाज म्हणाला, ''होय, 'दबंग 3' एप्रिलमध्ये फ्लोरवर येणार आहे. मात्र अजून लोकेशन्सबाबत निर्णय होणे बाकी आहे. आता मी फक्त ऐवढेच सांगू शकतो की यात सलमान खान काम करणार आहे आणि प्रभूदेवा याचे दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा नोएडा पोलिसांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असणार आहे.'' या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान आणि सोनाक्षीचीच जोडी जमणार आहे. याआधी सोनाक्षी सिन्हाने देखील या वर्षाच्या अखेरीस 'दबंग 3'चे शूटिंग सुरु होणार असल्याचे सांगितले होते.
सध्या सलमान भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमान आणि कॅटरिना भारतमध्ये एकत्र दिसणार आहे. प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफला या सिनेमात कास्ट करण्यात आले. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.