Join us

५६व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार अरबाज खान? शूरा खानसह मॅटर्निटी हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 10:07 AM

अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह करत दुसऱ्यांदा संसार थाटला. आता लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर शूरा खान गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अरबाज आणि शूराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या पर्सनल लाइफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वीच अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी निकाह करत दुसऱ्यांदा संसार थाटला. डिसेंबर २०२३मध्ये अरबाज आणि शूराने नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. आता लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर शूरा खान गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अरबाज आणि शूराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अरबाज आणि शूराला नुकतंच मॅटर्निटी हॉस्पिटलबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन अरबाज आणि शूराचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत मॅटर्निटी हॉस्पिटलबाहेर अरबाज त्याची दुसरी पत्नी शूराबरोबर दिसत आहे. पापाराझी या दोघांना "गुडन्यूज आहे का?" असं विचारत आहेत. पण, पापाराझींच्या प्रश्नाला उत्तर देणं अरबाज आणि शूराने टाळल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमुळे शूरा खान गरोदर असून अरबाज ५६व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आला आहे. 

अरबाज आणि शूराने एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये निकाह केला होता. अनेकदा अरबाज आणि शूरा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. शूरा अरबाजपेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. शूराआधी अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.  

टॅग्स :अरबाज खानसेलिब्रिटी