आयपीएल बेटिंग प्रकरणात अरबाजचे नाव येताच खवळले सलीम खान! घेतली धक्कादायक भूमिका !!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 7:55 AM
आयपीएल सामन्यांवर सट्टा लावून कोट्यवधी रूपये गमावून बसलेला अभिनेता अरबाज खान सध्या चर्चेत आहे. आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात गत ...
आयपीएल सामन्यांवर सट्टा लावून कोट्यवधी रूपये गमावून बसलेला अभिनेता अरबाज खान सध्या चर्चेत आहे. आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात गत शुक्रवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाने सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानला समन्स बजावला होता. बेटिंग प्रकरणात अरबाज खानची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांने सट्टा लावल्याची कबुली दिली. आता या प्रकरणी अरबाजचे वडिल सलीम खान यांचे एक धक्कादायक विधान केले आहे. होय, ‘spotboye.com ’ या आॅनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान यांनी वेगळीच भूमिका मांडली. या प्रकरणात अटक झालेले सोनू जालानचे तार अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरब आणि दक्षिण आफ्रिकेशी जुळलेले आहेत. मग माझ्याच मुलाचे नाव समोर का केले जात आहे. सोनू जालानच्या डायरीत एकट्या अरबाजचेच नाव सापडले का? एकाच व्यक्तिच्या भरवशावर त्याचे दुकान चालतेय का? असे सवाल सलीम खान यांनी केले. क्लब आणि जिमखान्यात जुगार चालतो़ घोड्यांच्या रेसची परवानगी आहे. लॉटरी ठीक आहे. पण आपल्या देशात किके्रटवर सट्टेबाजी ठीक नाही. तरिही यात अनेक लोक गुंतले आहेत. क्रिकेटमधील सट्टेबाजी कायदेशीर का होऊ नये, याबदल्यात आपल्या मोठा महसूल मिळणार नाही का? असेही ते म्हणाले.अरबाज व मलायका यांच्या घटस्फोटाचे कारण अरबाजचे सट्ट्याचे वाढते व्यसन होते, याचा त्यांनी यावेळी इन्कार केला.ALSO READ : Shocking - अरबाज खानने दिली आयपीएलमध्ये सट्टा लावल्याची कबुलीठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यांवर सुरु असलेल्या आॅनलाइन बेटिंगचे रॅकेट उघड करताना डोंबिवलीतून तिघांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांच्या चौकशीत हे रॅकेट देशातला आघाडीचा बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड हा चालवत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी सोनूवर कारवाई करताना त्याला बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांनी सोनूची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे अरबाजही बेटिंग करीत असल्याची माहिती समोर आली. सोनूकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला होता. आतापर्यंत दोन कोटी ८० लाखांचा सट्टा तो हरला आहे. काही दिवस त्याने सूनला पैसे दिले ही. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी सोनूने अरबाजकडे तगादा लावला होता. सोशल मीडियावर अरबाजचे सोनूसोबतचे फोटोही व्हायरल झाले होते. अरबाजच्या आधी अभिनेता विंदु दारा सिंगदेखील सोनूला पहिल्या आयपीएल सीझन दरम्यान भेटला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या सोनूच्या संपर्कात देशातले ८० ते ९० बडे बुकी आणि अनेक सेलिब्रेटी असल्याची माहिती समोर येत आहे.