Join us

ऐतिहासिक चित्रपटांवरुन उद्भवलेले वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2017 12:43 PM

ऐतिहासिक चित्रपट आणि वाद हा काही नवीन नाही. चित्रपटाची कथा, पात्रे यांच्यावरुन अनेकदा चर्चेपासून हाणामाºया आणि प्रकरण न्यायालयात असे ...

ऐतिहासिक चित्रपट आणि वाद हा काही नवीन नाही. चित्रपटाची कथा, पात्रे यांच्यावरुन अनेकदा चर्चेपासून हाणामाºया आणि प्रकरण न्यायालयात असे घडले आहे. ‘पद्मावती’ चित्रपटातील कथेला विरोध म्हणून निर्माता संजय लीला भन्साली यांना राजपूत करणी सेनेच्यावतीने मारहाण करण्यात आली. बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट आणि त्यातून उद्भवलेले वाद याविषयी...पद्मावतीसंजय लीला भन्साली यांचा ‘पद्मावती’ हा अल्लाउद्दीन खिलजी आणि पद्मावती यांच्यावर आधारित चित्रपट आहे. या दोघांमधील कथित प्रेमप्रकरणावर करणी सेनेने विरोध दर्शविला होता. चुकीचा इतिहास संजय लीला भन्साली हे दाखवित असल्याचा आरोप करीत चित्रपटाचे शूटिंग रोखण्यात आले.बाजीराव मस्तानीगतवर्षी संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या चुकीचा इतिहास दाखविल्याच्या कारणावरुन पुण्यात जोरदार विरोध झाला होता. पेशव्यांच्या वंशजांनी याबाबत सरकारने कठोर पावले उचलावित अशी मागणी केली होती. कलेच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखविण्यात आला असून, मुळ इतिहासापेक्षा वेगळी कथा चित्रपटात साकारण्यात आली आहे. पिंगा ग पोरी.. हे गाणं आयटम साँगप्रमाणे दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.जोधा अकबरंआशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या जोधा अकबर या चित्रपटाला राजस्थानमधील राजपूत करणी सेनेने विरोध केला होता. चुकीचा इतिहास दाखविण्यात आल्याचा आरोप यात करण्यात आला होता.याशिवाय जोधा अकबर या दूरचित्रवाणी मालिकेलाही विरोध करण्यात आला होता. अकबरने जोधासोबत लग्न केल्याचा कोणताही पुरावा यात नसल्याचे यावेळी सांगण्यात आले होते. रामलीलासंजय लीला भन्साली यांच्या रामलीला या नावालाच अनेकांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर या चित्रपटाचे नाव गोलियोंकी रासलीला राम लीला असे ठेवण्यात आले. या चित्रपटात रणवीरसिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या भूमिका होत्या.