Join us

Birthday Special : फिल्मी आहे अर्चना पुरण सिंगची लव्हस्टोरी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 11:25 AM

पहिल्या लग्नात आलेल्या अपयशानंतर अर्चनाने पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण...

ठळक मुद्देपरमीत व अर्चना लग्नापूर्वी  चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचेही कुटुंबीय या नात्यामुळे खुश नव्हते.

‘कुछ कुछ होता है’ची मिस ब्रिगेंजा असो की ‘राजा हिंदुस्तानी’मधील करिश्मा कपूरची सावत्र आई अर्चना पुरण सिंग प्रत्येक भूमिकेत अगदी फिट बसते. टेलिव्हिजन, चित्रपट ते कॉमेडी शो अशा सगळ्यांत अर्चनाने काम केले. हे सांगायचे कारण म्हणजे, आज अर्चनाचा वाढदिवस. 26 सप्टेंबर 1962 रोजी जन्मलेल्या अर्चनाने अभिनेता आदित्य पांचोलीसोबत आपल्या करिअरची सुुरुवात केली होती. यानंतर नसीरूद्दीन शहा यांच्यासोबत ‘जलवा’ चित्रपटात ती झळकली. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. अग्निपथ, सौदागर, शोला और शबनम, आशिक आवारा, राजा हिंदुस्तानी अशा अनेक चित्रपटांत काम करणारी अर्चना सध्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये जजची भूमिका साकारते आहे.

 करिअरच्या सुरुवातीच्या काळात अर्चनाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. ‘बँड ऐड’ची तिची जाहिरात बघूनच तिला  ‘मिस्टर अँड मिसेज’ टीव्ही मालिका मिळाली. 1985 मध्ये आलेली दिग्दर्शक पंकज पाराशर यांची ‘करमचंद’ ही मालिका अर्चनाच्या करिअरमधील मोठा ब्रेक ठरली. त्यानंतर तिने अनेक मालिका, शोजमध्ये अभिनेत्री आणि प्रेझेंटर म्हणून काम केले.  

  1990 साली आलेल्या ‘आग का गोला’ या चित्रपटात सनी देओलसोबत लिप लॉक सीन देऊन अर्चना चर्चेत आली होती. तिच्या या बोल्ड सीन्सने सगळीकडे खळबळ माजली होती.

30 जून 1992 मध्ये अर्चनाने परमीत सेठीसोबत लग्न केले. हा तिचा दुसरा विवाह होता. या दोघांची लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे. अर्चनाचे पहिले लग्न अपयशी ठरले होते. यामुळे अर्चनाने पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण जेव्हा परमीत तिच्या आयुष्यात आला आणि सगळेच बदलले.

 एका पार्टीत अर्चना व परमीत पहिल्यांदा भेटले होते. पार्टीत अर्चना मॅगझिन वाचत होती. परमीत तिच्याजवळ गेला आणि तिची मॅगझिन जोरात खेचली. अर्चना यामुळे जाम संतापली. पण लगेच सॉरी म्हणून परमीतने तिची समजूत काढली. खरे तर परमीतने जाणीवपूर्वक असे केले होते. कारण त्याना अर्चनाशी मैत्री करायची होती. या पहिल्याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे परमीतचा केअरिंग स्वभाव बघून अर्चना त्याच्या प्रेमात पडली.  एकमेकांना डेट करत असताना परमीत दररोज अर्चनाला प्रपोज करण्यासाठी तीन गुलाब घेऊन जायचे आणि तिच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली द्यायचे. 

परमीत व अर्चना लग्नापूर्वी  चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचेही कुटुंबीय या नात्यामुळे खुश नव्हते.  पण अर्चना व परमीत यांचे प्रेम सच्चे होते. चार वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर अखेर  30 जून 1992 रोजी त्यांनी लग्न केले.     

टॅग्स :अर्चना पूरण सिंग