अभिनेत्री अर्चना पूरण सिंह (Archana Pooran Singh) तिच्या कॉमेडी व्हिडिओंमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या युट्यूब चॅनलवर ती व्लॉग शेअर करत असते. कपिल शर्मा शोमधूनही ती समोर येते. पण आता नुकतंच अर्चना पूरण सिंहला मोठी दुखापत झाल्याचं तिने स्वत:च सांगितलं आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिला गंभीर दुखापत झाली आहे. चेहऱ्यालाही लागलं आहे. अशा अवस्थेतच तिने फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
अर्चना पूरण सिंह राजकुमार रावसोबत फिल्मचं शूट करत आहे. शूटदरम्यान ती पडली आणि तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सेटवर ती ओरडताना दिसते. यानंतर ती हात फ्रॅक्चर झाल्याचं दाखवते. ती म्हणते, 'मी राजकुमारला कॉल केला आणि प्रोडक्शनमध्ये दिरंगाई होत असल्याने त्याची माफी मागितली. मी लवकर बरी होऊन कामावर येऊन असंही सांगितलं कारण माझ्यामुळे त्यांचं नुकसान होऊ नये असंच मला वाटत होतं.'
अर्चना पूरण सिंहला दुखापत झाल्याचं समजताच तिचा पती परमित सेठी आणि तिच्या मुलालाही देण्यात आली. एक मुलगा तर रडायलाही लागला. परमित गंमतीत म्हणाला, "ती खूप बडबड करत आहे. याचा अर्थ ती ठीक आहे."
अर्चना लवकरच पुन्हा शूटवर परतणार आहे. तिचे शूट अशा अँगलने केलं जाणार आहे ज्यात तिला झालेली दुखापत दिसणार नाही. तसंच तिला काहीच तासांसाठी सेटवर जावं लागणार आहे. राजकुमारचा हा आगामी सिनेमा नक्की कोणता हे मात्र समजू शकलेले नाही.