रणबीर कपूरचा Animal सिनेमा सध्या खूपच गाजतोय. त्यासोबतच सिनेमातील 'अरजन वैली' (Arjan Vailly) हे गाणंही धुमाकूळ घालतंय. सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हापासूनच हे गाणं प्रत्येकाच्या ओठावर आहे. गाण्यातील अर्जन वैली हा खरोखरंच कोण होता हे मात्र खूप कमी जणांना माहित असेल. अर्जन वैली आणि लुधियानाचं काय कनेक्शन आहे जाणून घ्या.
'अरजन वैली' हा शीख समाजातील महान योद्धा हरि सिंह नलवा यांचा मुलगा होता. त्यांचा जन्म लुधियानाजवळील काउंके गावाजवळ झाला होता. हरि सिंह नलवा हे महाराजा रंजीत सिंहच्या खालसा फौजचे महान नायक होते आणि त्यांच्या धाडसाची इतिहासात नोंद आहे. ते इतके धाडसी होते की त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या सिंहालाही त्यांनी खंजीर खुपसून मारले होते. त्यांची दोन मुलं होती. अरजन सिंह आणि जवाहर सिंह. दोघंही ब्रिटीश राज्यकर्त्यांविरोधात लढले होते. अर्जुन सिंह (पंजाबीत अरजन सिंह) वडिलांप्रमाणेच धाडसी होते. सिनेमातील गाणं त्यांच्यावरच बनवण्यात आलं आहे.
गाण्यातील वैली शब्दाचा अर्थ होतो युद्धाला न घाबरणारा आणि स्वत:च्या हक्कांसाठी लढणारा. अरजन सिंह यांच्या शौर्याची गाथा या गाण्यात वर्णन करण्यात आली आहे. पंजाबी गायक भूपिंदर बब्बल यांनी हे गाणं गायलं आहे.
Animal ने तीनच दिवसात २०० कोटींचा बिझनेस केला आहे. सिनेमाची क्रेझ पाहता मध्यरात्रीचे शोही सुरु करण्यात आले आहेत. Animal रणबीर कपूरचा सर्वात जास्त ओपनिंग कलेक्शन करणारा सिनेमा ठरला आहे. सिनेमात रणबीर -रश्मिका मंदानाची फ्रेश जोडीही पाहायला मिळत आहे.