Join us

...म्हणून मलायकाच्या प्रेमात पडला अर्जुन कपूर, पहिल्यांदाच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 3:58 PM

अर्जुन व मलायकाच्या वयात बरेच अंतर आहे. पण जगाची पर्वा न करता दोघेही प्रेमात पडले आणि कालांतराने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली.

ठळक मुद्दे  मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.  

निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा ही ओळख अर्जुन कपूरने (Arjun Kapooor ) कधीच पुसली. आज अर्जुनने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. अर्थात अर्जुनच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या लव्ह लाईफची चर्चाच जास्त रंगली. दीर्घकाळापासून अर्जुन मलायका अरोरासोबत (Malaika Arora ) रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन व मलायकाच्या वयात बरेच अंतर आहे. पण जगाची पर्वा न करता दोघेही प्रेमात पडले आणि कालांतराने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली. (Arjun Kapooor recently opened up about his ladylove Malaika Arora )

आपले नाते लपवण्याचा सुरुवातीला दोघांनीही बराच खटाटोप केला. पण योग्य वेळ येताच दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली. आता तर अर्जुन त्याच्या ‘लेडी लव्ह’चे कौतुक करताना थकत नाहीये. मलायकात अर्जुनने असे काय पाहिले की, तो तिच्या प्रेमात बुडाला? असा प्रश्न अनेकांना पडतो. अर्जुनने आता या प्रश्नाचेही उत्तर दिले आहे.HT Brunch ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन मलायकासोबतच्या नात्यावर बोलला.

म्हणून पडला प्रेमात...

अर्जुन मलायकाबद्दल भरभरून बोलला. तो म्हणाला, मलायका स्वबळावर सन्मानजनक आयुष्य जगतेय, ही तिची गोष्ट मला सर्वाधिक आवडते. वयाच्या 20 व्या वर्षी तिने काम सुरू केले आणि आयुष्यात पुढे जात सन्मान मिळवला. तिची हीच गोष्ट मला खूप भावते.

ती कधीच आजुबाजूच्या गोष्टींबद्दल तक्रार करत नाही...

मलायकाला मी कधीच तक्रार करताना पाहिले नाही. आजुबाजूला कितीही प्रतिकूल गोष्टी घडोत, ती कधीच तक्रार करत नाही. ती कामाबद्दल बाता मारण्याऐवजी काम संपवण्याकडे तिचा कल असतो. तिच्या विचारात मी कधीच नकारात्मकता बघितली नाही. आयुष्यात आनंदी कसे राहायचे याचाच ती सतत प्रयत्न करत असते. मी रोज तिच्याकडून नवे काही तरी  शिकतो, असे अर्जुन म्हणाला.  मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.  

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा