Join us

अर्जुन कपूर व मलायका अरोराने घेतला लग्नाचा निर्णय; पुढील वर्षी बांधणार लग्नगाठ??

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 12:13 PM

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांतील नाते आता जगापासून लपून राहिलेले नाही. काल-परवाच मिलान एअरपोर्टवरचा हातात हात घेतला मलायका व अर्जुनचा फोटो व्हायरल झाला होता. 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांतील नाते आता जगापासून लपून राहिलेले नाही. काल-परवाच मिलान एअरपोर्टवरचा हातात हात घेतला मलायका व अर्जुनचा फोटो व्हायरल झाला होता. गेल्या काही दिवसांत मलायका आणि अर्जुन दोघेही खुल्लमखुल्ला एकत्र फिरतांना दिसत आहेत. मलायकाने आपला वाढदिवस खास अर्जुनसोबत साजरा केला होता. अगदी अलीकडे ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’च्या मंचावरही दोघांची केमिस्ट्री दिसली. त्यापूर्वी लॅक्मे फॅशन वीकमध्येही हे कपल एकत्र दिसले. आता ताजी बातमी खरी मानाल तर मलायका व अर्जुन दोघेही पुढील वर्षी लग्नबंधनात अडकू शकतात. होय, एका सूत्राच्या हवाल्याने फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, मलायका व अर्जुन दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. दोघेही आपल्या नात्यावर सध्या मौन बाळगून आहेत. पण एकमेकांसोबत ते अतिशय आनंदी आहे आणि पुढील लग्न करण्याचा निर्णय दोघांनीही घेतला आहे. त्यापूर्वीहे कपल आपले नाते अधिकृतरित्या मान्य करेल, असेही या वृत्तात म्हटले आहे.

 

मलायका व अरबाज खान यांचा घटस्फोट होण्याआधीपासून मलायका व अर्जुनच्या कथित अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत. मलायका व अर्जुनची वाढती जवळीक या घटस्फोटाला कारणीभूत ठरली, अशीच त्यावेळी चर्चा होती. ही बातमी सगळ्यांसाठीच शॉकिंग होती. कारण अर्जुन कपूरचे कुटुंब आणि सलमानचे कुटुंब यांच्यात घनिष्ट संबंध होते. शिवाय अर्जुन कपूर सलमानची बहीण अर्पिता हिला अनेक वर्ष डेट करत होता. अर्थात अर्जुन वा मलायका अद्यापही यावर काहीही बोलले नाहीत. पण  लॅक्मे फॅशन वीक2018 दरम्यान मलायका व अर्जुन एकत्र दिसले आणि  नव्याने चर्चेला सुरूवात झाली.  

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर