Join us

संदीप और पिंकी फरारमध्ये अशा भूमिकेत दिसणार अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 6:17 AM

अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या आगामी चित्रपट संदीप और पिंकी फरार या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाचे काम सुरु होते.

अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्या आगामी चित्रपट संदीप और पिंकी फरार या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचे काम  गेल्या काही महिन्यांपासून सुरु होते. या चित्रपटाचा निर्मिती करणाऱ्या यश राज फिल्मसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोघांचे चित्रपटातील लूकमधले फोटो शेअर केले आहेत.    या चित्रपटात अर्जुन कपूर एक हरयाणवी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तो एका पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशात दिसतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही भूमिका साकारण्यासाठी अर्जुनने जवळपास 3 महिन्यांची ट्रेनिंग घेतली आहे. cnxoldfiles/script> तर परिणीती कॉर्पोरेट लूकमध्ये दिसते आहे. परिणीती यात एका असा मुलीची भूमिका साकारते आहे जी खूप महत्त्वकांशी आहे.  हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित असल्याचे त्याने सांगितले होते. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. समाजातील बदल लोकांच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवू शकतात, हे या चित्रपटात दिसेल, असे त्याने सांगितले होते. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथेबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. या चित्रपटातीची गोष्ट एका कॉरपोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलीची आहे. जो आपल्या ध्येयाला घेऊन खूप फोक्स्ड असते. अर्जुन कपूर पोलिस कर्मचाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. 6 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परिणीती आणि अर्जुनने इश्कजादे चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  तब्बल 4 वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.