Join us

दोन बायका फजिती ऐका! अर्जुन कपूरच्या 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:40 IST

'मेरे हसबंड की बीवी'  या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'मेरे हसबंड की बीवी'  या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत असून या नव्या पोस्टरने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अर्जुन कपूरच्या नव्या सिनेमाचं हे फनी पोस्टर व्हायरल झालं आहे. यामध्ये एका बाजूला भूमी पेडणेकर घोड्यावर बसल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला रकुल प्रीत सिंग आहे. मधोमध अर्जुन कपूर उभा असून भूमी आणि रकुल दोन्ही बाजूने त्याला ओढणीने खेचताना दिसत आहेत. "खिंचो और खिंचो...शराफत की यही सजा होती है...क्लेश हो या क्लॅश, फसता तो मुझ जैसा आम आदमी है", असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. 

'मेरी हसबंड की बिवी' हा सिनेमा नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार आहे. 'लव्ह ट्रँगल नही सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. जॅकी भगनानी आणि वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केलीय. २१ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अर्जुन कपूर कशी कमाल करणार? सिनेमा सुपरहिट होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरभूमी पेडणेकर रकुल प्रीत सिंग