Join us

जीवन नरक बनलं होतं...., मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूर पहिल्यांदाच इतका बिनधास्त बोलला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 1:27 PM

Arjun Kapoor Malaika Arora Relationship : मलायका घटस्फोटित. एका मुलाची आई. शिवाय अर्जुनपेक्षा वयाने कितीतरी मोठी. यामुळे अर्जुन व मलायका दोघांनाही प्रचंड टीका सहन करावी लागली...

अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोराच्या ( Malaika Arora ) आयुष्यात अर्जुन कपूरची (Arjun Kapoor ) ‘ऑफिशिअल’ एन्ट्री झाली होती. तोपर्यंत या नात्याचा सुगावाही कोणाला लागला नव्हतो. तेव्हापासून आजपर्यंत अर्जुन व मलायका एकमेकांसोबत आहेत. अधूनमधून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येतात. पण तेवढ्यापुरत्याच. मलायका घटस्फोटित आहे. एका मुलाची आई आहे. शिवाय अर्जुनपेक्षा वयाने कितीतरी मोठी आहे. यामुळे दोघांनाही प्रचंड टीका सहन करावी लागली. आजही मलायका व अर्जुन यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होतात. पण यामुळे या कपलच्या आयुष्यात काहीही फरक पडला नाही. एका ताज्या मुलाखतीत अर्जुन मलायकासोबतचं नातं आणि या नात्यातील चढऊतारांबद्दल बोलला.हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने मलायकाशी संबंधित प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत.

 जीवन नरक बनलं होतं....तू मलायकासोबत तिच्या चांगल्यावाईट काळात  खंबीरपणे उभा राहिलास, याबद्दल छेडलं असता तो म्हणाला, ‘हो, मी तिच्यासोबत आणि ती माझ्यासोबत.  कठीण काळात आम्ही दोघंही एकमेकांसोबत होतो. सुरूवातीला सोशल मीडियामुळे गोष्टी प्रचंड गढूळ झाल्या होत्या. वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळी टीका आणि अनेक अडचणी व संकटाच्या काळात आम्ही एकमेकांसोबत राहिलो. अनेक दिवस आमचं जीवन जणू नरक बनलं होतं. आम्ही सगळ्यांसमोर आपलं नातं कबुल करूनही आम्हाला खूप काही सहन करावं लागलं. मलायकाने खूप काही सोसलं. पण तिने आमच्या नात्याचा आदर केला, याबद्दल मला तिचं कौतुक वाटतं. मलायकासोबत उभं राहताना मला कुठल्याहीप्रकारे एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटलं नाही.  जी योग्य आहे, त्याच्यासोबत मी उभा आहे, एवढंच मला वाटलं.’

  नातं सार्वजनिक करताना...मलायकासोबतचं नातं जगजाहिर करण्यामागे कुठलंही खास प्लॅनिंग नव्हतं. वेळ आली तसं ते घडत गेलं आणि सगळं व्यवस्थित पार पडलं. यावर बऱ्यावाईट प्रतिक्रिया येणार, याची मनाची तयारी झाली होती. आमच्या वयातील फरकाबद्दल आम्हाला टीकेला सामोरं जावं लागेल, याची आम्हाला कल्पना होती. पण हे सगळं काही काळासाठी असेल, याचीही आम्हाला जाणीव होतं. ज्यांना आमच्याबद्दल खरोखर प्रेम आहे, ते या नात्यानं आनंदी होणार, हे आम्हाला माहित होतं. आमच्यासाठी फक्त त्यांचं मत महत्त्वाचं होतं. अन्य लोकांच्या मताची आम्हाला पर्वा नव्हती आणि नाही. मलायका नातं सार्वजनिक करू इच्छिते का, तिला आणखी वेळ हवा का? याचा विचार निश्चितपणे केला आणि एका निश्चित बिंदूवर आल्यावर आम्ही आमचं नातं मान्य केलं, असं तो म्हणाला.

प्रेमाला कुठल्याही लेबलची गरज नाही...मी मलायकासोबत आहे आणि ती माझ्यासोबतच. प्रेमाचा आणि वयाचा काहीही संबंध नाही. यात काहीही गैर नाही. प्रेम फक्त प्रेम असतं. त्याला कुठल्याही लेबलची गरज नाही, असंही तो म्हणाला.

 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा