Join us

नारळ फोडला, हार घातला... अर्जुन कपूरने खरेदी केली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 14:51 IST

अभिनेता अर्जुन कपूरने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या अभिनेत्याने लक्झरी कार नाही तर एक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अर्जुन कपूरने स्कूटरसमोर नारळ फोडला आणि तिला हारही घातला.  यावेळी अर्जुन खूप आनंदी दिसत होता. अभिनेत्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

अर्जुन कपूरच्या या नवीन स्कूटरची किंमत 1.10 लाख रुपये आहे. अर्जुन कपूरने विकत घेतलेली ही स्कूटर सामान्य स्कूटर नसून ती भारतातील पहिली RUV आहे, जी फुल मेटल बॉडीसह येते.  ही स्कूटर क्रूझ कंट्रोल मेकॅनिझमसह सुसज्ज असून तिला 0 ते 100 टक्के चार्ज करण्यासाठी अंदाजे 2 तास 35 मिनिटे लागतात.

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. 'सिंघम अगेन' मध्ये अर्जुन कपूर खलनायकी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पदुकोण, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि इतर कलाकार आहेत. अर्जुनकडे वरुण धवन आणि दिलजीत दोसांझसोबत अनीस बज्मी दिग्दर्शित 'नो एंट्री 2' हा कॉमेडी चित्रपट देखील आहे.  

टॅग्स :अर्जुन कपूरइलेक्ट्रिक कार / स्कूटर