Join us

WHAT!! अर्जुन-मलायकाचं वाजलं?  ख्रिसमस, न्यू इअर सेलिब्रेशचा बेतही झाला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 4:19 PM

अर्जुनच्या निर्णयानं मलायका रूसली, चर्चा तर हीच...!!

ग्लॅमर इंडस्ट्रीत अगदी सहज नाती बनतात आणि तितक्याच सहज तुटतातही. अशी अनेक उदाहरणं देता येतील. सध्या अशाच एका नात्याची चर्चा आहे. होय, मलायका अरोरा (Malaika Arora)  व अर्जुन कपूर (Arjun Kapoor) दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक पार्ट्यांना, इव्हेंट्समध्ये दोघं सोबत दिसतात. मध्यंतरी हे कपल लग्न करणार अशीही चर्चा होती. पण आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय. होय, मलायका व अर्जुन यांच्यात सध्या फार काही ‘आॅल वेल’ नसल्याचं कळतंय. होय, दोघांमध्ये भांडण झालं असून यामुळे दोघेही नाताळ व नव वर्ष एकत्र साजरं करणार नसल्याचीही चर्चा आहे.अर्जुननं नुकतीच मोहित सूरीच्या ‘एक विलेन रिटर्न्स’ या चित्रपटाचं शूटींग संपवलं. याशिवाय तो अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. चित्रटगृहं उघडल्यानं हाती असलेले चित्रपट लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याचं हेच बिझी शेड्यूल मलायकाच्या नाराजीचं कारण ठरलं आहे.

म्हणून झालं भांडण?चर्चा खरी मानाल तर मलायकानं अर्जुनसोबत ख्रिसमस व न्यू ईअर सेलिबे्रट करण्याचा प्लान केला होता. पण अर्जुननं म्हणे बिझी शेड्यूलमुळे नकार दिला. यामुळे मलायका अपसेट झाल्याचं कळतंय. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अर्जुन लवकरच ‘कुत्ते’ या सिनेमाचं शूटींग सुरू करणार आहे. जवळपास 60 दिवस तो या चित्रपटात बिझी असणार आहे. दोन महिन्यांत हा चित्रपट पूर्ण करण्याचा म्हटल्यावर ख्रिसमस व न्यू ईअरचा प्लान अर्जुनला रद्द करावा लागला आहे आणि मलायका यामुळं रूसली आहे.मलायका खरंच रूसली असेल तर अर्जुन तिचा हा रूसवा कसा दूर करतो, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन व मलायका दोघंही अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होतं. यावेळी मलायका डार्क पिंक कलरच्या साडीत दिसली होती. तिच्या या लुकची नेहमीप्रमाणे जबरदस्त चर्चा झाली होती,

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर