मलायका अरोरा (Malaika Arora ) व अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे बॉलिवूडचं ट्रेंडिंग कपल आहे. या ना त्या कारणानं या कपलची चर्चा सुरूच असते. काल मात्र भलतंच घडलं. होय, मलायका प्रेग्नंट असून अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी एका मीडिया हाऊसने दिली आणि ही बातमी बघून अर्जुन कपूरचा पारा चढला. ही खोटी बातमी पेरणाऱ्यांना त्याने चांगलंच सुनावल. सोशल मीडियावर त्याने आपला संताप व्यक्त केला. पण अद्यापही अर्जुनचा राग शांत झालेला नाही. आज त्याने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर करत आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली.
मलायका व अर्जुन दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरी हे कपल लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्या चर्चा दोघांनीही मनावर घेतल्या नव्हत्या. पण आता मलायका गरोदर असल्याच्या चर्चांनी मात्र दोघंही त्रस्त झाले आहेत.