Join us

आजीचा ‘हा’ आदेश मानणार का अर्जुन कपूर? चढणार का बोहल्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 3:05 PM

वाढदिवसानिमित्त अर्जुनला अनेक गिफ्ट मिळालेत. यात एक गिफ्ट अर्जुनची आजी निर्मल कपूर यांचेही होते.

गत २६ जूनला बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा झाला. आधी अर्जुनने बँकॉकमध्ये रंगलेल्या आयफा अवार्ड सोहळ्यात धम्माल मस्ती केली. येथून परतला त्याच दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता. मग त्या रात्री फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत अर्जुनच्या वाढदिवसाची पार्टी रंगली. वाढदिवसानिमित्त अर्जुनला अनेक गिफ्ट मिळालेत. यात एक गिफ्ट अर्जुनची आजी निर्मल कपूर यांचेही होते. हे गिफ्ट पाहून अर्जुनला कमालीचा आनंद झाला, पण या गिफ्टसोबत मिळालेला संदेश वाचून मात्र त्याला जाम धडकी भरली. होय, या गिफ्टसोबत अर्जुनना आजीचे एक पत्र मिळाले. यात पत्रात आजीने अर्जुनला लवकर लग्न करण्यास बजावले आहे.

 

 अर्जुनने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर केला आहे आणि सोबत एक कॅप्शनही. ‘When your Dadi’s gift is a threat & request along with a bribe & a command, all rolled into one’ असे कॅप्शन अर्जुनने या फोटोला दिलेयं.  आजीच्या या आदेशानंतर अर्जुन कधी लग्न करतो, ते पाहणे त्यामुळे इंटरेस्टिंग असणार आहे. तसेही अर्जुन सध्या सिंगल आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी अर्जुन सलमानची बहीण अर्पिता खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. मध्यंतरी अर्पिताचीच वहिनी मलायका अरोरा खान हिच्यासोबत अर्जुनचे नाव जोडले गेले होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. अर्थात डॅड बोनी कपूर यांनी समजवल्यानंतर अर्जुनने मलायकासोबतचे सगळे संबंध तोडले होते. तूर्तास अर्जुनच्या आयुष्यात कुणीही नाही. पण अर्जुनला लवकरात लवकर आपला लाईफ पार्टनर मिळावा आणि आजीची इच्छा पूर्ण व्हावी, ही अपेक्षा आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरबॉलिवूड