Join us  

'तुमच्यामुळे आम्ही बदनाम होतो'; फोटोग्राफर्सच्या 'या' कृतीवर भडकला अर्जुन कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 2:02 PM

Arjun kapoor: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुन संतापल्याचं दिसून येत आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor) लवकरच 'एक व्हिलन रिटर्न्स' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे सध्या अर्जुन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यामध्येच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कायम शांतपणे छायाचित्रकारांना फोटो काढू देणारा अर्जुन यावेळी  फोटोग्राफर्सवर भडकल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर आम्हाला बदनाम करण्यामागे तुम्ही जबाबदार असता असंही तो रागाच्या भरात म्हणाला. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुन संतापल्याचं दिसून येत आहे. अर्जुनला पाहताच त्याचे काही चाहते त्याच्यासोबत फोटो काढायला येतात. मात्र, या चाहत्यांना मागे सारत काही फोटोग्राफर्स पुढे येतात. ज्यामुळे अर्जुनला या चाहत्यांसोबत फोटो काढता येत नाही. ज्यामुळे अर्जुन चिडतो.

"सगळ्यात पहिले आतल्या बाजूला या. रस्त्यावर गर्दी करु नका. हा रोड काय आपला नाहीये. तुम्ही लोक असे वागता आणि नाव आमचं खराब होतं. आम्ही बदनाम होतो. असं करु नका", असं म्हणत अर्जुन या फोटोग्राफर्सला ओरडतो.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अर्जुनचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अर्जुन सध्या त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत आहे. 

टॅग्स :अर्जुन कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी