Join us

अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 11:01 IST

सध्या रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन'(Singham Again Movie)मुळे अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) चर्चेत आहे. या चित्रपटात डेंजर लंकाची निगेटिव्ह भूमिका साकारुन अभिनेता प्रशंसा मिळवत आहे.

सध्या रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन'(Singham Again Movie)मुळे अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) चर्चेत आहे. या चित्रपटात डेंजर लंकाची निगेटिव्ह भूमिका साकारुन अभिनेता प्रशंसा मिळवत आहे. मात्र यादरम्यान अर्जुनने एक खुलासा केला आहे, ज्यामुळे चाहते हैराण झाले आहेत. अलिकडेच अभिनेत्याने एका गंभीर आजाराचा सामना करत असल्याचा खुलासा केला आहे.

अलिकडेच अभिनेता अर्जुन कपूरने गंभीर आजाराचा सामना करत असल्याचे सांगितले. तसेच या आजारामुळे त्याची शारिरीक आणि मानसिक अवस्था कशी बिघडत चालली आहे, याचाही खुलासा केला आहे. नुकतेच हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या मेंटल हेल्थसंदर्भात हैराण करणारा खुलासा केला. 

अभिनेता या आजाराने आहे ग्रस्त

अर्जुन कपूरने सांगितले की, मी हाशिमोटो थायरॉयडिटिस ऑटोइम्यून आजाराने त्रस्त आहे. याचा शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होत आहे. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती शरीरात असलेल्या थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करते, ज्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. याचा माझ्या जीवनशैलीवरही वाईट परिणाम होत आहे. शरीरातील ऊर्जेची पातळी हळूहळू कमी होत जाते. एक अभिनेता असल्याने मला माझ्या फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, ज्यामध्ये अशा समस्यांमुळे अडथळे निर्माण होतात. 

'सिंघम अगेन' अर्जुन कपूरचा कमबॅक सिनेमा म्हणून पाहिला जात आहे. कारण यापूर्वी अर्जुनने एक विलेन रिटर्न्स, कुत्ते आणि द लेडी किलर वाईटरित्या फ्लॉप ठरला. 

मलायकासोबत झालं ब्रेकअपअलिकडेच अर्जुन कपूर आणि गर्लफ्रेंड मलायका अरोरा वेगळे झाल्याची बातमी समोर आली आहे. आता अर्जुननेही या प्रकरणाला दुजोरा दिला असून तो सिंगल असून त्याचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले आहे. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आली आणि अनेक वर्षे त्यांचे प्रेम होते. पण आता या जोडप्याचे मार्ग कायमचे वेगळे झाले आहेत. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा