बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) व अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor ) दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अशात अचानक अशी काही चर्चा सुरू झाली की, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. होय, 49 वर्षांची मलायका प्रेग्नंट असून अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची एकच चर्चा रंगली. मलायका व अर्जुन कपूर ऑक्टोबर महिन्यात लंडन ट्रिपवर गेले होते. यादरम्यान ही गुडन्यूज त्यांनी आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर केल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला. ही चर्चा सुरू झाली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण आता या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
-आणि अर्जुन कपूर संतापला...मलायका प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली आणि अर्जुन कपूर संतापला. इन्स्टास्टोरीवर त्याने आपला हा संताप व्यक्त केला. ‘हा प्रकार अतिशय खालच्या दर्जाचा आहे आणि तुम्ही हे सगळं सहज करत आहात. अशा कचरा बातम्या चालवणं अतिशय अनैतिक व असंवेदशनशील प्रकार आहे. काही पत्रकार अशाप्रकारच्या बातम्या सतत पसरवत आहेत आणि आम्ही दुर्लक्ष करतो म्हणून ते मर्यादा लांघताना दिसत आहेत. हे अयोग्य आहे. आमच्या खासगी आयुष्याशी खेळण्याची हिंमत करू नका...,’अशा आशयाची इन्स्टा स्टोरी अर्जुनने शेअर केली आहे. यातून त्याचा संताप स्पष्ट दिसतोय.
दरम्यान मलायकाच्या कुटुंबातील एका सदस्याने या चर्चा निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मलायका प्रेग्नंट असल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. या फक्त अफवा आहेत, असं या सदस्याने स्पष्ट केलं. मलायकाने 2017 साली अरबाज खानशी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिने अर्जुन कपूरसोबतचं नातं जगजाहिर केलं होतं. आताश: दोघांचं नातं कुणापासूनही लपून राहिलेलं नाही. मध्यंतरी अर्जुन व मलायका लग्न करणार असल्याचीही चर्चा होती. पण अद्याप तरी दोघांनी तशी घोषणा केलेली नाही.
दरम्यान मलायका लवकरच ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमधून ओटीटीवर पदार्पण करत आहे. हा शो मलायकाच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यावर आधारित असणार आहे. या शोमध्ये अर्जुन कपूर व अरबाज खानही झळकणार आहेत.