Join us

मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने रिलेशनशीपवर केलं वक्तव्य, म्हणाला - “प्रेमाचा अर्थ…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:09 IST

Arjun Kapoor And Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांनी २०१८ साली डेट करण्यास सुरुवात केली. बराच काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघेही २०२४ मध्ये वेगळे झाले.

अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांनी २०१८ साली डेट करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दोघांनाही त्यांच्या नात्यावरून खूप ट्रोल करण्यात आले, पण त्यांनी लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले आणि फक्त त्यांच्या नात्याला महत्त्व दिले. बराच काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघेही २०२४ मध्ये वेगळे झाले. अर्जुनने अखेर राज ठाकरेंच्या दिवाळी पार्टीत आपण सिंगल असल्याचा खुलासा केला. आता अर्जुनने एका मुलाखतीत त्याच्या आदर्श नातेसंबंधाची व्याख्या सांगितली.

अर्जुन कपूरने न्यूज १८ शोशामध्ये दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आदर्श नात्याबद्दल खुलासा केला. तो गमतीने म्हणाला की, 'जो देतो त्याचंही चांगलं, जो देत नाही त्याचंही चांगलं.' तो पुढे म्हणाला की, 'आज मला प्रेमातून काय हवे आहे ते म्हणजे माझे मौन कोणाशी तरी शेअर करणे आणि ते खूप महत्वाचे आहे. तुम्ही दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलात तरीही, तुम्ही सतत न बोलल्याशिवाय कनेक्ट राहू शकता. कोणताही उद्देश न ठेवता गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत.

''प्रेमाचा अर्थ असा नाही की...''अभिनेता पुढे म्हणाला, 'दोन व्यक्तींमधील प्रेम हे अनेक शब्दांत व्यक्त करण्याची गरज नसते. तिथे आराम आणि सहजता असली पाहिजे. दिवस संपल्यानंतर तुम्ही तुमच्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी उत्सुक असाल. प्रेमाचा अर्थ असा नाही की पूर्ण वेळ एकत्र राहणे. तुम्ही खरोखरच त्यांच्यासोबत तुमचे आयुष्य घडवले पाहिजे. दोन व्यक्तींनी एकमेकांचा व्यवसाय समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे.

लग्नाबद्दल म्हणाला...अर्जुन कपूरने आगामी 'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी त्याच्या लग्नाच्या प्लानबद्दलही सांगितले. काही झाले तर मी तुम्हाला सर्व सांगेन, असे तो म्हणाला. आजचा दिवस चित्रपटावर चर्चा करण्याचा आणि साजरा करण्याचा दिवस आहे. मला चित्रपटाबद्दल बोलायचे आहे. मला असे वाटते की मी माझ्या वैयक्तिक जीवनाविषयी पुरेसे संभाषण आणि चर्चा करण्यास परवानगी दिली होती जेव्हा मी सोयीस्कर होतो आणि जेव्हा योग्य वेळ होती. सध्या मी 'मेरे हसबंड की बीवी' असण्याचा आनंद साजरा करतोय आणि जेव्हा माझ्या बायकोबद्दल बोलण्याची वेळ येईल, तेव्हा योग्य वेळी बोलू. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा