Join us

अर्जुन कपूर सांगतोय, या कारणामुळे मीडियापासून लपवले नाही आमचे नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 13:38 IST

अर्जुन आणि मलायकाने त्यांचे नाते मीडियापासून का लपवले नाही याविषयी अर्जुनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना सध्या अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळते. ते कधी डिनर डेटवर जातात तर कधी एकत्र चित्रपट पाहाताना दिसतात. अर्जुनच्या इंडियाज मोस्ट वाँटेड या चित्रपटाच्या प्रिमियरला देखील मलायका आवर्जुन उपस्थित राहिली होती. यावेळी पहिल्यांदाच दोघांनी मीडियासमोर एकत्र पोझ दिली. 

फोटोग्राफर्सने अर्जुन आणि मलायका यांना एकत्र फोटो काढण्यासाठी सांगितले, त्यावेळी त्यांनी कपल पोझ दिली. यावेळी अर्जुनने मलायकाच्या कंबरेवर हात ठेवून फोटो काढला. इतकेच नाही तर यावेळी मलायकासोबत अर्जुनच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. मलायका आणि अर्जुन त्यांचे नाते मीडियापासून न लपवता ते सार्वजनिक ठिकाणी देखील एकत्र दिसत आहेत. 

अर्जुन आणि मलायका आता तर फोटोग्राफर्सना पाहून त्यांना फोटोसाठी पोज देताना देखील दिसून येतात. अर्जुन आणि मलायकाने त्यांचे नाते मीडियापासून का लपवले नाही याविषयी अर्जुनने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. तो सांगतो, आम्ही मीडियासमोर येण्याचा विचार केला कारण आम्हाला वाटलं, मीडिया आमच्या नात्याचा आदर करत आहे. ते आमच्यासोबत अतिशय चांगल्या प्रकारे वागत असल्यानेच आम्ही मीडियासमोर एकत्र येण्याचे ठरवले. काही वेळा उगाचच कोणत्याही गोष्टीबद्दल विचारले जाते अथवा त्याबद्दल लिहिले जाते. पण आमच्याबाबतीत तसे कधीही घडले नाही आणि त्याचमुळे आम्ही स्वतःहून त्यांना फोटो काढायला देतो... त्यांच्याशी गप्पा मारतो. मी केवळ त्यांना इतकेच सांगितले आहे की, आमच्या घराच्या खाली ठाण मांडून बसू नका. कारण असे केले तर आम्ही घरात लपून बसलेलो आहोत असे सगळ्यांना वाटेल. पण आम्ही कोणापासून काहीही लपवत नाही आहोत. केवळ माझ्या किंवा तिच्या शेजाऱ्यांना मीडियाचा त्रास होऊ नये असे मला वाटते. आम्ही काहीही चुकीचे करत आहे असे माझे ठाम मत आहे. त्यामुळेच आम्ही मीडियापासून लपत आहोत असा संदेश लोकांपर्यंत पोहोचू नये असे मला वाटते.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून प्रेक्षकांना त्यांची जोडी खूपच आवडते. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा