बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. अर्जुन-मलायकाच्या नात्याची आणि त्यांच्या ब्रेकअपची इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा झाली. दोघांनाही चाहते एकमेकांबद्दल विचारताना दिसून येतात. अशातच एक चाहता भर कार्यक्रमात अर्जुन कपूर समोरचं मलायकाच्या (Malaika) नावाने ओरडल्याचं पाहायला मिळालं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी 'मेरे हसबंड की बीवी' (Mere Husband Ki Biwi ) या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच अर्जुन कपूर दोन्ही सहकलाकार भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत सिनेमाचं प्रमोशन करताना पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ समोर आलाय. ज्यात अर्जुन हा रकुल आणि भूमीसोबत स्टेजवर उभा असून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतोय. तेवढ्यात गर्दीतून एका चाहत्यानं थेट अर्जून समोरचं मलायकाचं नाव घेतलं. मलायकाचं नाव ऐकल्यानंतर अर्जुनला आपण नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळालं नाही. तो थोडासा रागात आणि थोडासा गोंधळलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. पण तो काहीच बोलला नाही. यानंतर रकुल अर्जुनकडे पाहून थोडीशी हसली.
अर्जुन आणि मलायकाचं गेल्या वर्षी ब्रेकअप झालं होतं. २०१६ पासून मलायका आणि अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांनी काही वर्षांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची घोषणा केली. दोघंही एकत्र सुट्टीवर जायचे आणि एकमेकांसोबतचे फोटो ही सोशल मीडियावर शेअर करायचे मात्र २०२४ च्या सुरुवातीपासूनच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यांचं ब्रेकअप सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं.
दरम्यान, अर्जुन कपूरच्या 'मेर हस्बंड की बीवी' या सिनेमाच्या ट्रेलरला सध्या प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. शिवाय गाणी देखील चर्चेत आली आहे. 'लव्ह ट्रँगल नही सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. त्यामुळे या चित्रपटात वेगळं काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. तर मलायकाच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ती तरुण मनसुखानीच्या आगामी 'हाऊसफुल ५' चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस, जॉन अब्राहम, कृती सेनन, संजय दत्त यांच्यासह अनेक मोठे स्टार आहेत.