Arjun Kapoor shares emotional note for his mother : अर्जुन कपूरची (Arjun Kapoor ) आई मोना शौरी आज या जगात नाही. असती तर आज अर्जुन व अंशुलासोबत ती तिचा 58 वा वाढदिवस साजरा करत असती.आईच्या वाढदिवशी अर्जुनने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट वाचून क्षणभर तुम्हीही भावुक व्हाल.
अर्जुनची पोस्ट ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आई... जेव्हा तू मला कॉल करायची तेव्हा तुझं नाव फोनच्या स्क्रीनवर दिसायचं, ते मिस करतोय. तुला आई म्हणून हाक मारायचो, ते मिस करतोय. तुझी आणि अंशुलामधील कधीही न संपणारी चर्चा... ती मिस करतोय. मला तुझी खूप आठवण येते आई... रोज तुझा सुगंध मिस करतो.. आज मी मोठा झालो आहे. पण माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये तू दिलेली साथ, माझं बालपण सगळं काही मिस करतोय. तुझं हसणं, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी मिस करतोय. तू नेहमी माझ्या बाजूने असायचीस, तेही मिस करतोय. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. पण आजही तू आमच्यासोबत आहेस आणि मला आशा आहे की माझ्या या स्वभावाचा तुला अभिमान वाटेल. लव्ह यू... तुझा प्रामाणिक गुबगुबीत गालांचा मुलगा...,अशी पोस्ट अर्जुनने शेअर केली आहे.
अर्जुन आपल्या आईच्या अतिशय जवळ होता.आईच्या निधनानंतर तिच्या आठवणीत त्याने आपल्या हातावर ‘माँ’ असा टॅटू गोंदवला आहे. अर्जुन 11 वर्षांचा असताना अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरे लग्न केले होते. अर्जुनवर याचा मोठा परिणाम झाला होता. इतका की,आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर मी कधीच लग्न करणार नाही, हे अर्जुनने ठरवून टाकलं होतं. पण आता या कटू आठवणीत त्याने पुसून टाकल्या आहेत. आईची आठवण मात्र त्याला अजूनही कासावीस करते.
गेल्या महिन्यात अर्जुनने आईच्या आठवणीत अशीच एक पोस्ट शेअर केली होती. अर्जुननं त्याचा ब्लॅक अॅड व्हाइट फिल्टर असलेला आकाशाकडे पाहतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. ‘मला नेहमी वाटतं की माझी आई मला वरून पाहातेय,’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं होतं.अर्जुन आणि अंशुला यांची आई मोना कपूर ही बोनी कपूर यांची पहिली पत्नी होती. 25 मार्च 2012 रोजी मोना यांचं निधन झालं.