Join us

मलायका अरोराच्या मिस्ट्री मॅनचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:33 IST

मलायकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका मिस्ट्री मॅनला स्पॉट करण्यात आलं आहे. मिस्ट्री मॅनचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता अर्जुन कपूरने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मलायका आणि अर्जुनमध्ये दुरावा आला असून  त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच मलायका स्पेनमध्ये अर्जुनशिवायच व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. सोशल मीडियामध्ये मलायकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका मिस्ट्री मॅनला स्पॉट करण्यात आलं आहे. मिस्ट्री मॅनचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता अर्जुन कपूरने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्पेन व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले होते. यामध्ये मलायकाच्या सेल्फीबरोबर काही पदार्थांचे फोटो होते. यातीलच एका फोटोमध्ये मिस्ट्री मॅन दिसत होता. या मिस्ट्री मॅनचा चेहरा फोटोत स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे तो नक्की कोण आहे, आणि मलायकाबरोबर स्पेनमध्ये काय करतोय? अर्जुन कपूरशी ब्रेकअपनंतर मलायका या मिस्ट्री मॅनला डेट करतेय का? अशा चर्चांना उधाण आलं. 

अभिनेत्रीचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अर्जुन कपूरने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनच्या इन्स्टास्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "शांततेसाठी उपस्थित असणं आवश्यक आहे", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

गेल्या काही वर्षांपासून मलायका आणि अर्जुन कपूर एकमेकांना डेट करत होते.मलायका आणि अर्जुन लिव्ह इनमध्ये राहत असल्याचंही बोललं जात होतं. एकमेकांबरोबरचे फोटो पोस्ट करत ते प्रेम व्यक्त करतानाही दिसायचे. अनेक कार्यक्रमांना त्यांनी एकत्र हजेरीही लावली होती. पण, अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या लग्नात मलायका कुठेच दिसली नाही. या शाही वेडिंग सोहळ्याला अर्जुन मात्र उपस्थित होता. त्यामुळेच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या. 

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरसेलिब्रिटी