Join us

'यात अर्जुन कपूरच अव्वल..!', मलायका अरोराने शेअर केलं बेडरूम सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 15:32 IST

मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी लव्ह लाइफमुळे. तिचे आणि अभिनेता अर्जुन कपूरचे नाते कुणापासून लपलेले नाही. त्या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीर केले आहे. ते बऱ्याचदा एकत्र डिनर डेट आणि व्हॅकेशन्सला एकत्र स्पॉट होतात.दरम्यान आता मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात ती अर्जुन कपूरबद्दल काही स्पेशल गोष्टी सांगताना दिसत आहे. या व्हिडीओत तिने तिला कसे पुरूष आवडतात, याबद्दलदेखील सांगितले आहे.

एमटीव्हीच्या सुपरमॉडेल ऑफ दी इयर सीझन २ या कार्यक्रमात मलायका अरोराने पाहुणी म्हणून हजेरी लावली होती. यावेळी शोचे होस्ट मिलिंद सोमण यांनी तिची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा काही भाग एमटीव्हीच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ जवळपास ३८ सेकंदांचा आहे. या व्हिडिओत दिसून येते, की मिलिंद सोमणने मलायका अरोराला प्रश्न विचारला की एक आदर्ष पुरूष कसा असावा. त्यावर मलायकाने आपली आवड सांगितली.

मलायका अरोरा म्हणाली की, मला खरेतर रफ मुले आवडतात. जी मुले खूप भयंकर फ्लर्ट करतील. तसेच जे चांगल्या प्रकारे किस करू शकतील. यासोबतच त्यांना दाढी असणे अगदी गरजेचे आहे. मला क्लीन शेव्ह केलेली चिकनी मुले आजिबात आवडत नाही. यावेळी तिने अर्जुनचा उल्लेख केला. अर्जुन कपूर तिला सर्वात चांगल्या प्रकारे किस करतो. यासोबतच तिला सर्वात चांगल्या प्रकारे ओळखणारी व्यक्तीही अर्जुनच असल्याचे तिने सांगितले. अर्जुन कपूरला तू शेवटचा टेक्स्ट मेसेज काय पाठवला होता? असे विचारल्यानंतर तिने लाजत उत्तर दिले की आय लव्ह यू टू.

तुझा सेलिब्रिटी क्रश कोण आहे असे विचारल्यानंतर मलायका अरोराने हॉलिवूड अभिनेता डॅनियल क्रेगचे नाव घेतले. जेम्स बाँड या भूमिकेसाठी डॅनियल लोकप्रिय आहे. तर फीमेल क्रशबाबत विचारल्यावर तिने बेला हदीदचे नाव घेतले. बेला ही एक २४ वर्षांची मॉडेल आहे. २०१६ मध्ये ती अमेरिकेची मॉडेल ऑफ द इयर होती.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरमिलिंद सोमण