अभिनेता अर्जून कपूर याच्या आगामी सिनेमाची घोषणा होताच त्याला लोकांनी ट्विटरवर ट्रोल करणं सुरू केलंय. इतकंच नाही तर अर्जून कपूरवरील मीम्सही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्याचं नाव ट्विटरवर ट्रेन्ड होत आहे. मीम्स बनवणाऱ्यांसाठी अर्जून कपूर हा नेहमीच टार्गेट राहिलेला आहे. दुसरीकडे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिज्मच्या वादात सगळेच स्टार किड्स लोकांच्या निशाण्यावर आहेत.
कैशवी नायर दिग्दर्शित लव्हस्टोरीचं टायटल अजून ठरलं नसलं तरी या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात अर्जूनसोबत रकुल प्रीत सिंह, जॉन अब्राहम आणि अदिती राव हैदरी यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.
एका यूजरने लिहिल की, 'ज्याप्रकारे आता गोष्टी घडल्या आहेत. अशात अर्जून कपूरला कास्ट करण्यासाठी मोठी हिंमत लागते. निर्माता अति आत्मविश्वासी दिसतोय. कास्ट कोणतीही असो, हा त्याच्या आधीच्या सिनेमाप्रमाणेच डिझास्टर ठरेल'.
तेच एकाने अर्जून कपूरच्या अभिनयाची खिल्ली उडवत लिहिले की,' पानीपत...काय शानदार इतिहास होता. एक चांगली आणि सुंदर कथा....पण या माणसाने त्याच्या अभिनयाच्या जोरावर हा सिनेमा बर्बाद करून टाकला'.
एकाने ट्विट केलं की, 'लोकहो, चिंता करण्याची गरज नाहीये. अर्जून कपूर स्वत:च कोणताही सिनेमा बर्बाद करण्यासाठी सक्षम आहे'.
अभिनेता रणदीप हुड्डाच्या फॅन्सना चिंतेत टाकणारी बातमी, हॉस्पिटलमध्ये केलं त्याला दाखल!
कसाबचीही एवढी ट्रायल झाली नसेल, रियाच्या समर्थनार्थ स्वराचा तीव्र संताप
मी सुशांतच्या पैशांवर जगत नव्हते; रिया चक्रवर्तीने सगळाच 'हिशेब' दिला!