Join us

मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर अर्जुन कपूर सर्वात आधी पोहोचला; म्हणाला, "काहीही झालं तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:56 IST

रिलेशनशिपमध्ये नक्की कुठे चुकतं? अर्जुन कपूरने दिलं उत्तर

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचं इंडस्ट्रीत ब्लॉकबस्टर कमबॅक झालं आहे. 'सिंघम अगेन' मध्ये त्याने 'डेंजर लंका' ची भूमिका साकारली. त्याचा हा खलनायकी अवतार सर्वांवर भारी पडला. अर्जुन कपूरला याआधी त्याच्या कामावरुन खूप ट्रोल करण्यात आलं. तसंच वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. फ्लॉप सिनेमा, मलायकासोबत ब्रेकअप यामुळे तो चर्चेत होता. काही महिन्यांपूर्वी मलायका अरोराच्या वडिलांचं निधन झालं. या कठीण प्रसंगी अर्जुन कपूर सर्वात आधी पोहोचला होता. यावर नुकतंच त्याने भाष्य केलं आहे.

मलायका अरोरा (Malaika Arora)  आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांनी आपलं ४ वर्षांचं नातं संपवत ब्रेकअपचा निर्णय घेतला. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते मात्र अचानक त्यांचा मार्ग वेगळा झाला. मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या घरी पोहोचणाऱ्यांमध्ये अर्जुन कपूर सर्वात पहिला व्यक्ती होता. त्याने मलायका आणि कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली. याविषयी राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये अर्जुन म्हणाला, "आयुष्यात थोडं मागे गेलो तर जसं बाबा, जान्हवी आणि खूशीसोबत हेच झालं होतं. तेव्हा मी त्यांच्यासाठी उभा होतो जे मनापासून केलं होतं. तसंच याही केसमध्ये मी तिच्यासाठी जे केलं ते मनापासून केलं. जर मी कोणाशी भावनिकरित्या जोडला गेलो असेल तर मी त्या व्यक्तीच्या चांगल्या, वाईट सर्व प्रसंगांमध्ये उभा राहीन. जर चांगल्या क्षणी मला बोलवलं तर आवर्जुन जाईन . वाईट प्रसंगी गरज असेल तर नक्कीच जाईन. मला खूप मित्र आहेत अशातला भाग नाही. पण जर मी कोणासोबत जोडला गेलो आहे तर मी कायमच त्याच्यासाठी उभा असेन. अगदी मग त्यालाच जर मी नको असेल तर मी अंतर पाळेन पण गरज असेल तेव्हा मी तिथे नक्की असेल."

नक्की कशामुळे तुझं रिलेशनशिप टिकत नाही असं तुला वाटतं. यावर तो म्हणाला, "समोरच्या व्यक्तीला गमावण्याची मला नेहमीच भीती वाटते.  याच कारणांमुळे माझे ब्रेकअपही होतात किंवा रिलेशनशिपच सुरु होत नाही.यावर मला काम करायचं आहे कारण कधीकधी हे महागात पडतं."

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोराबॉलिवूड