Join us

​अर्जुन कपूर आता राहाणार बोनी कपूर यांच्यासोबत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 4:52 AM

बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची मुले अंशुला आणि अर्जुन यांनी श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी, खुशी आणि ...

बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची मुले अंशुला आणि अर्जुन यांनी श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी, खुशी आणि वडील बोनी कपूर यांना आधार दिला. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच अर्जुन कपूर नमस्ते लंडन या चित्रपटाचे चित्रीकरण सोडून मुंबईला रवाना झाला होता. तो लगेचच जान्हवी आणि खुशी यांना भेटायला अनिल कपूर यांच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर तो श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईवरून आणण्यासाठी दुबईला रवाना झाला होता. तसेच मुंबई विमानतळावरून देखील कपूर कुटुंबियांसोबत अंधेरीच्या बोनी कपूर यांच्या घरी गेला होता. तो रात्रभर त्याच्या बहिणीसोबत म्हणजेच अंशुलासोबतच बोनी कपूर यांच्या घरी होता. अंतिमयात्रेच्या वेळी देखील अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला आपल्या दोन्ही बहिणींना सांभाळत होते. श्रीदेवी यांच्या निधनामुळे बोनी कपूर पूर्णत: हतबल झाले होते, अर्जुन त्यांना अंतिमयात्रेत देखील आधार देताना दिसून येत होता.श्रीदेवी यांच्या निधनानंतर काहीच दिवसांत त्यांची मोठी मुलगी जान्हवीचा वाढदिवस होता. श्रीदेवी यांनी जान्हवीच्या वाढदिवसाचे प्लानिंग ज्याप्रकारे केले होते, त्याचप्रकारे तिचा हा वाढदिवस तिच्या कुटुंबियांनी साजरा केला. जान्हवीच्या वाढदिवसाला तिची बहीण खुशी, चुलत बहीण सोनम, शान्या आणि तिचे वडील बोनी कपूर, काका संजय कपूर, संपूर्ण कुटुंब तसेच अंशुला देखील उपस्थित होती. जान्हवी आणि खुशीला दुःखातून बाहेर येण्यासाठी अर्जुन आणि अंशुला खूप मदत करत आहेत. या चौघांमधील नाते आता पहिल्यापेक्षा खूप चांगले झाले आहे. जान्हवी आता अंशुलाला इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर फॉलो देखील करायला लागली आहे. डेक्कन क्रोनिकल या वर्तमानपत्राच्या बातमीनुसार तर अर्जुन आता बोनी कपूर यांच्यासोबत राहाण्याचा विचार करत आहे. अर्जुन आणि अंशुला कित्येक वर्षांपासून एकटेच राहात आहेत. पण आता ते दोघेही आपल्या वडिलांसोबत राहाणार असल्याची चर्चा आहे. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबत लग्न केल्यामुळे अर्जुन आणि अंशुलाची आई मोना कपूर चांगलीच दुखावली गेली होती. त्यामुळे अर्जुन आणि अंशुला यांनी श्रीदेवी यांचा कधीच आई म्हणून स्वीकार केला नव्हता. पण त्यांच्या निधनानंतर जान्हवी आणि खुशीला त्यांनीच आधार दिला. आता तर हे सगळेचजण एकत्र राहाणार असल्याचे म्हटले जात आहे. Also Read : ​अशी झाली होती श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची पहिली भेट