अर्जुन कपूरने ट्रोलर्सचा पुन्हा एकदा घेतला क्लास!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 09:58 PM2018-10-03T21:58:08+5:302018-10-03T21:59:56+5:30

ज्या मुद्यावर बडे बडे स्टार्स बोलायला कचरतात, त्या मुद्यांवर अर्जुन कपूर बेधडक स्वत:चे भले-बुरे मत मांडतो. अलीकडे एका इव्हेंटमध्ये अर्जुन इंटरनेट ट्रोलिंगवर बोलला.

arjun kapor talks about social media trolling | अर्जुन कपूरने ट्रोलर्सचा पुन्हा एकदा घेतला क्लास!

अर्जुन कपूरने ट्रोलर्सचा पुन्हा एकदा घेतला क्लास!

googlenewsNext

अर्जुन कपूर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. कुठल्याही मुद्यावर स्वत:चे परखड मत मांडणाऱ्या बॉलिवूडच्या काही निवडक कलाकारांपैकी तो एक. ज्या मुद्यावर बडे बडे स्टार्स बोलायला कचरतात, त्या मुद्यांवर अर्जुन कपूर बेधडक स्वत:चे भले-बुरे मत मांडतो. अलीकडे एका इव्हेंटमध्ये अर्जुन इंटरनेट ट्रोलिंगवर बोलला.
‘कुणीही स्वत:च्या बहिणीबद्दल वाईट लिहित नाही़ सोशल मीडियावर अश्लिल कमेंट वाचतो, तेव्हा हे अश्लिल कमेंट करणा-यांच्या घराबाहेर मी असेच काही लिहून आलो तर त्यांना कसे वाटेल, हा एकच विचार माझ्या मनात येतो. सेलिब्रिटीही माणूस आहेत, हे लोक विसरतात,’ असे अर्जुन कपूर म्हणाला.
यानंतर अर्जुनने मीडियालाही लक्ष्य केले. ‘स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण सोशल मीडियावर लोक पडद्याच्या मागे राहून वार करतात. अशास्थितीत चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन न देणे, ही मीडियाचीही जबाबदारी आहे. कुणाला त्याच्या लांब वा तोकड्या कपड्यांवरून ट्रोल केले जात असेल तर मीडियाने अशा बातम्या देऊ नये. अशा बातम्यांमुळे ट्रोलर्सला प्रोत्साहन मिळते,’असेही अर्जुन म्हणाला.
ट्रोलिंगवर अर्जुन कपूर पहिल्यांदा बोललेला नाही़ याआधीही जान्हवी कपूरला ट्रोल करणा-यांना त्याने फटकारले आहे. जान्हवीच्या तोकड्या कपड्यांवर बातमी करणाºया एका मीडिया हाऊसलाही त्याने धारेवर धरले होते.‘तुमची नजर अशा गोष्टी शोधत असेल तर तुम्हाला लाज वाटायला हवी. देशात मुलींकडे कशा नजरेतून पाहिले जाते, याचे हे उदाहरण आहे,’ असे ट्विट त्याने केले होते.
श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर हे दोघेही जान्हवी व खुशी या सावत्र बहिणींना फुलासारखे जपतांना दिसताहेत. एकेकाळी अर्जुन व अंशुला जान्हवी व खुशीचे नावही ऐकणे पसंत करायचे नाहीत. पण श्रीदेवींच्या निधनानंतर दोघेही जान्हवी व खुशीच्या कधी नव्हे इतक्या जवळ आले आहेत. आपल्या सावत्र बहिणींना आणि वडिलांना आपली गरज आहे, याची जाणीव अर्जुनला झाली आहे आणि अशास्थितीत अर्जुन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. 



 

 

 

Web Title: arjun kapor talks about social media trolling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.