Join us  

Anil Kapoor Birthday :  2060 साली कसा दिसेल अर्जुन व अनिल कपूर? हे फोटो पाहून म्हणाल, झक्कास!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 3:12 PM

Anil Kapoor Birthday : भावा तुझ्या क्रिएटीव्हिटीला सलाम...!! अर्जुननं लाडक्या चाचूला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

Anil Kapoor Birthday : अनिल कपूर (Anil Kapoor) म्हणजे बॉलिवूडचा सगळ्यांत फिट अभिनेता. वय वर्ष 65, पण आजही तो इतका फिट दिसतो की, त्याला पाहून नव्या अभिनेत्यांना कॉम्प्लेक्स येतो. आजही त्याला पाहताच ‘झक्कास’ हा एकच शब्द बाहेर पडतो. आज त्याचा 65 वा वाढदिवस साजरा करतोय. यानिमित्ताने अनिलवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनिलचा पुतण्या अर्जुन कपूर (Arjun Kapoor ) यानेही हटके अंदाजात काकाला शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनने काकाचे अनेक फोटोशॉप्ड फोटो शेअर केले आहेत आणि ते सुद्धा अगदी झक्कास आहेत.

पहिला फोटो अर्जुनच्या लहानपणीचा आहे आणि त्याच्यासोबत त्याचा आवडता चाचू नाही. यात अनिल एकदम यंग दिसतोय.

दुसर्‍या फोटोत सोनम कपूर, अनिल कपूर असे तिघे आहेत आणि अर्जुनने स्वत:चा फोटो त्यावर फोटोशॉप्ड केला आहे. 

तिसर्‍या फोटोत अर्जुनच्या तरूणाईतला. त्यात अर्जुन आपल्या मित्रांसोबत पार्टी करतोय आणि मागे अनिल कपूर तितकाच यंग दिसतोय, जितका पहिल्या फोटोत.

शेवटच्या फोटोत अर्जुनने त्याचा व अनिल कपूरचा 2060 सालचा लुक शेअर केला आहे. म्हणजे, 2060 मध्ये अर्जुन कसा दिसेल आणि त्याचा चाचू कसा दिसेल, हे त्यानं दाखवलं आहे. या फोटोत अर्जुन चक्क म्हातारा दिसतोय. अनिल मात्र जशाच्या तसा...‘यूथ का खजाना, जोशीला जवानी का नमुना... सिर्फ एव्हरग्रीन ही नहीं, ऐसी एव्हरलास्टिंग ब्युटी कभी देखी ही नहीं... दिन ब दिन युवा होते रहते है तो इनका क्या कसूर... इट्स द क्युरिअर केस ऑफ अनिल कपूर, ’ असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.

अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच तो अ‍ॅनिमल, जुग जुग जियो आणि फायटर या सिनेमात दिसणार आहे.  

टॅग्स :अनिल कपूरअर्जुन कपूर