Join us  

अर्जुन रामपाल सांगतोय, या कारणामुळे रॉक ऑन 2 झाला फ्लॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2016 4:34 PM

अर्जुन रामपालचा रॉक ऑन 2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आणि आता काहीच ...

अर्जुन रामपालचा रॉक ऑन 2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आणि आता काहीच दिवसांत कहानी 2 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...कहानी 2 या चित्रपटात तू प्रमुख भूमिका साकारत आहेस, पण तू कहानी पाहिला होतास का? आणि कहानी 2 या चित्रपटाची ऑफर आल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होतीकहानी या चित्रपटाची कथा आणि विद्या बालनचा अभिनय मला प्रचंड आवडला होता. विद्याला भेटून तिच्या कामाचे कौतुकदेखील मी केले होते. मला कहानी 2 या चित्रपटासाठी सुजोय घोषचा फोन आला होता आणि तुला कथा ऐकवायची आहे असे त्याने मला सांगितले. खरे तर मी कधीही कथा वाचतो, मला कथा ऐकायला आवडत नाही. पण सुजोय माझा मित्र असल्याने मी त्याला भेटायला तयार झालो. ही कथा ऐकल्यानंतर मी सुजोयला हा चित्रपट तुझ्या करियरमधला बेस्ट चित्रपट असणार असल्याचे सांगितले आणि काहीही न विचारता हा चित्रपट साईन केला.तू चित्रपटाची पटकथा ऐकता नाहीस तर ती वाचतोस असे का?मला पटकथा कोणीही ऐकवलेली आवडत नाही. कारण प्रत्येकाची कथा सांगण्याची एक वेगळी स्टाईल असते. तसेच ती कथा सांगताना ते एकप्रकारे परफॉर्म करून दाखवत असतात. त्यामुळे मला ही गोष्ट आवडत नाही. कोणत्याही दिग्दर्शकाने मला कथेबाबत सांगितल्यावर त्याच्याकडून मी कथा मागवतो आणि स्वतः ती पहिल्यांदा वाचतो. मी कथा वाचताना एक चित्र माझ्यासमोर उभे राहाते. तसेच मी त्यावेळी मुद्दे लिहून काढतो आणि मला काही शंका असल्यास मी विचारतो. मला कोणत्याही कथेवर स्वतः विचार करायला आवडतो.  रॉक ऑन 2 या चित्रपटाला नोटाबदलाचा फटका बसला आहे असे तुला वाटते का?रॉक ऑन 2 हा चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेतील असे आम्हाला नक्कीच वाटले होते. पहिला आठवडा जोरात जाणार असे आम्हाला सगळ्यांनाच वाटत असताना अचानक नोटाबदलाचा निर्णय आला आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना धक्काच बसला. कारण लोकांनी या निर्णयानंतर चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. लोकांकडे अत्यावश्यक गोष्टी खरेदी करायला पैसे नाही आहेत तर ते चित्रपट पाहायला का पैसा घालवतील? या गोष्टीमुळेच आमचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला. पुढील काळातील अनेक चित्रपटांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतील लोकांना एकत्र येऊन यावर विचार करणे गरजेचे आहे.