अरमान मलिक एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायका यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. क्रितिका मलिक आणि पायल मलिक या त्याच्या दोन बायका. हे तिघंही युट्यूबर आहेत. आता हे कुटुंब पुन्हा चर्चेच आलं आहे. अरमानच्या बायका पायल मलिक आणि कृतिका मलिक यांनी काही महिन्यांपूर्वी बाळांना जन्म दिला होता. आता नुकतीच त्याची पत्नी कृतिकाने पुन्हा गरोदर असल्याची घोषणा केला आहे.
अरमानच्या पत्नींनी स्वत: त्यांच्या ताज्या व्लॉगमध्ये हे उघड केले आहे. अरमानची पत्नी कृतिकाने ती आई बनणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावरुन त्यांच्यावर कौतुकांचा वर्षावही होत आहे आणि सोबतच अनेकजण त्यांना ट्रोलदेखील करत आहेत.
अरमान मलिक पाचव्यांदा बाबा होणार आहे. त्याने दोन लग्न केली आहेत. अरमान मलिकने 2011 मध्ये पायलसोबत लग्न केले. त्यानंतर 2018 मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत लग्न केले. हे सर्वजण एकाच घरात मोठ्या प्रेमानं, गुण्या गोविंदानं राहतात. त्याला पहिली पत्नी पायलपासून चिराग, तूबा आणि अयान अशी तीन मुले आहेत. पायल आणि कृतिका काही महिन्यांपूर्वीच एकत्र गरोदर राहिल्या. पायलने आयव्हीएफद्वारे दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. तर कृतिका पहिल्यांदा एका मुलाची आई झाली, ज्याचे नाव तिने जैद ठेवले. आता कृतिका पुन्हा आई होणार आहे.