सलमान खानची बहीण अर्पिता खानने दुस-यांदा आई झाली अर्पिता आणि आयुष शर्मा यांच्या घरी गोंडस मुलीच आगमान झाले आहे. अर्पिता आणि आयुष शर्माला अहिला नावाचा एक मुलगा आहे. मुलीचं नाव अयात ठेवण्यात आले आहे, अर्पिताने भाईजानच्या वाढदिवसाच्या दिवशी खास गिफ्ट दिले आहे. सलमान खान आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करतो आहे. बाळाच्या आगमनाने खान कुटुंबियांचाही आनंद द्विगुणित झाला आहे. आयुष शर्मा आणि अर्पिताने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी प्रसार माध्यमांचे देखील आभार मानले आहेत. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
खार इथल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला आहे. 18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शर्मासोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे. अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे.
सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अहिलवर करतो. मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. मामा बनल्यापासून सलमान वेळात वेळ काढून भाचा अहिलसोबत मजा-मस्ती करत असतो. अहिल आणि सलमानच्या मजामस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. सलमान खान आणि त्याचा भाचा अहिल यांचे नाते ‘बी टाऊन’च्या कलाकारांसाठी एक उदाहरण असल्यासारखे म्हणावे लागेल.