बॉलिवूडचा लोकप्रिय गायक ए आर रहमानचा घटस्फोट झाला आहे. ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो लग्नाच्या २९ वर्षांनी घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. ए आर रहमानने ट्वीट करत घटस्फोट घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. लग्नानंतर इतक्या वर्षांनी वेगळं होणं त्यांच्यासाठी कठीण होतं, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली आहे.
ए आर रहमानचं ट्वीट
आम्हाला वाटलं होतं की आम्ही ३० वर्ष पूर्ण करू. पण, प्रत्येक गोष्टीला अंत असतो. तुटलेल्या हृदयाने देवाचं सिंहासनही थरथर कापू शकते. तरीदेखील यामध्येही आपण अर्थ शोधत राहतो. भले त्या हृदयाच्या तुटलेल्या तुकड्यांना त्यांची जागा परत मिळतही नसेल. या कठीण प्रसंगात आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आमच्या मित्रपरिवाचे आभार...
१९९५ मध्ये ए आर रहमान आणि सायरा बानो यांनी लग्न केलं होतं. त्यांना खतीजा, रहीमा या दोन मुली आणि अमीन हा मुलगा आहे. घटस्फोट घेण्याबाबत सायरा बानो यांनी याआधी सांगितलं होतं. बराच विचार केल्यानंतरच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.