संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई’ या चित्रपटात ‘सर्किट’ची भूमिका साकारून नावारूपास आलेला अभिनेता अर्शद वारसी याचा आज (१९ एप्रिल) वाढदिवस. ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या अर्शदने आजपर्यंत अनेक चित्रपटांत दमदार अभिनय केला. ‘इश्किया’ आणि ‘जॉली एलएलबी’ हे त्याचे चित्रपट खास गाजले. आज अर्शद बॉलिवूडचा प्रतिभावान, हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तेव्हा जाणून घेऊ या, अर्शदच्या या प्रवासाबद्दल...
पोटासाठी पैशांची गरज होती. या काळात अर्शदने घरोघरी जात लिपस्टिक व सौंदर्य प्रसाधने विकण्याचे काम स्वीकारले. या पैशात भागत नाही म्हटल्यावर फोटो लॅबमध्येही काम केले. हे सगळे करत असताना त्याच्या मनात डान्स शिकण्याची इच्छा जोर धरू लागली. मग काय, अर्शदने काम करता करता एक डान्स ग्रूप ज्वॉईन केला. हा निर्णय अर्शदच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.
१९९३ मध्ये ‘रूप की रानी चोरों का राजा’चे टायटल ट्रॅक कोरिओग्राफ करण्याची संधी त्याला मिळाली. हा चित्रपट आपटला पण ‘रोमिया नाम मेरा’ हे अर्शदने कोरिओग्राफ केलेले गाणे मात्र तुफान लोकप्रीय झाले होते. हे अर्शदचे मोठे यश होते.पुढे अर्शदला अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून संधी मिळाली. महेश भट यांच्या ‘ठिकाणा’ व ‘काश’ या चित्रपटात त्याने अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले.
अमिताभ बच्चन यांची प्रॉडक्शन कंपनी एबीसीएलद्वारे अर्शदने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, खुद्द जया बच्चन यांनी अर्शदला ‘तेरे मेरे सपने’ची आॅफर दिली होती. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे मेरे सपने’या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून अर्शद हिट झाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. राजकुमार हिरानीच्या ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’ आणि ‘लगे रहो मुन्ना भाई’ या विनोदी चित्रपटांमधील सर्किटच्या भूमिकेमुळे अर्शद वारसी खºया अर्थाने प्रकाशझोतात आला.