Join us

अर्शद वारसीने शेअर केली या क्रिकेटरच्या निधनाची फेक न्यूज! लोक म्हणाले, जिंदा है भाई!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 2:33 PM

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी एक फेक बातमी शेअर करून चांगलाच फसला. अर्शदने कोणतीही खातरजमा न करता ही बातमी शेअर केली आणि मग काय, चांगलाच ट्रोल झाला.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सनथ जयसूर्याच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी एक फेक बातमी शेअर करून चांगलाच फसला. होय, श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि वन डे क्रिकेटमधील आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्या याच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अर्शदने कोणतीही खातरजमा न करता ही बातमी शेअर केली आणि मग काय, चांगलाच ट्रोल झाला. अतिशय धक्कादायक आणि दु:खद बातमी..., असे सनथ जयसूर्याच्या निधनाची बातमी शेअर करताना अर्शदने लिहिले.

विशेष म्हणजे, अर्शदच्या अनेक चाहत्यांनीही त्याचे हे ट्वीट वाचून सनथ जयसूर्याला श्रद्धांजली देणे सुरु केले. पण त्याचवेळी काही लोकांनी सनथ जयसूर्याच्या निधनाची बातमी फेक असल्याचे अर्शदच्या लक्षात आणून दिले. काहींनी खात्री न करता अशा फेक न्यूज शेअर केल्याबद्दल संतापही व्यक्त केला.

‘भाई, ये खबर झूठ है’, असे एका युजरने लिहिले. तर अन्य दुसºया युजरने ‘भाई मेरे, पहले फॅक्ट चेक कर लिया करो,’ अशा शब्दांत अर्शदला सुनावले. ‘सेलिब्रिटी खातरजमा न करता अशा खोट्या बातम्या शेअर करतात, हे चिंतीत करणारे आहे,’ असे अनेकांनी लिहिले.

काही दिवसांपूर्वी सनथ जयसूर्याच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. कॅनडात एका कार अपघातात सनथ जयसूर्याचे निधन झाल्याचे या बातमीत म्हटले होते. यानंतर खुद्द सनथ जयसूर्याने ट्वीट करत, ही बातमी खोटी असून मी अगदी सहीसलामत असल्याचे सांगितले होते. माझ्याबद्दलच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. मी श्रीलंकेत आहे आणि इतक्यात कधीच कॅनडात गेलेलो नाही. अशा खोट्या बातम्यांपासून दूर राहा, असे आवाहनही त्याने केले होते.

टॅग्स :अर्शद वारसी