‘सीडीआर’च्या जाळ्यात कलाकार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 11:13 AM
सध्या महाराष्ट्रात बॉलिवूडशी संबंधित हायप्रोफाइल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरण चांगलेच गाजत आहे. पडद्यावर नेहमीच ‘जासूस’ची भूमिका साकारणारे कलाकार ...
सध्या महाराष्ट्रात बॉलिवूडशी संबंधित हायप्रोफाइल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरण चांगलेच गाजत आहे. पडद्यावर नेहमीच ‘जासूस’ची भूमिका साकारणारे कलाकार वास्तविक जीवनातही शरलॉक होम्स आणि करमचंदसारखे जासूस होताना दिसत आहेत. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी पत्नीवर पाळत ठेवत आहे, तर कंगना राणौत हृतिक रोशनचा फोन नंबर इतरांना देत आहे. यात आणखी भर म्हणून जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफने एक्स बॉयफ्रेंड साहिल खानचे परस्पर कॉल डिटेल्स काढल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. सध्या इंडस्ट्रीसह देशभरात सीडीआर प्रकरण गाजत आहे. कारण झगमगाटाच्या दुनियेत स्टायलिश जीवन जगणाºया कलाकारांमध्ये एकमेकांप्रती एवढी असुरक्षिततेची भावना का? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. नवाजची पत्नीवर पाळत‘बजरंगी भाईजान’मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीने शोधपत्रकाराची भूमिका साकारून अबोल मुन्नीला तिच्या परिवारापर्यंत सुखरूप पोहोचविण्यास मोलाची भूमिका बजावल्याचे प्रेक्षकांनी बघितले. आता रिअल लाइफमध्ये त्याचा असाच एक कारनामा समोर आला आहे. नवाजुद्दीनवर आरोप आहे की, पत्नी अंजलीवर पाळत ठेवण्यासाठी त्याने एका प्रायव्हेट डिटेक्टिवची नेमणूक केली होती. त्याच्या मदतीनेच त्याने पत्नीचे फोन डिटेल्स प्राप्त केले. आपली पत्नी कुठे जाते?, कोणाशी बोलते हे जाणून घेण्यासाठीच त्याने हा सर्व उपदव्याप केला. विशेष म्हणजे जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा त्याने कंगना-हृतिकसह जॅकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ-साहिल खान यांनीही असेच केल्याचे छातीठोकपणे सांगितले. ब्लॅकमेलिंगसाठी सीडीआरचा वापररिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमध्ये सीडीआर डाटा मिळविण्यासाठी बºयाचशा कलाकारांकडून असे प्रयत्न यापूर्वी झाले आहेत. कारण इंडस्ट्रीत ब्लॅकमेलिंगसाठी हे खूप मोठे शस्त्र समजले जाते. वास्तविक हेरगिरी सर्वसामान्यांमध्येही केली जाते. प्रेमसंबंध, कौटुंबिक वाद यातून निर्माण होणाºया असुरक्षिततेमुळे लोक आपल्याच लोकांची हेरगिरी करीत असतात. परंतु बॉलिवूडमध्ये छबी सुधरविण्यासाठी, करिअरमध्ये बढती मिळविण्यासाठी आणि इतर मोठ्या महत्त्वाकांक्षेसाठी सेलिब्रिटी अशाप्रकारचे कृत्य करीत आहेत. पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकला जेव्हा असे वाटले की, क्रिकेटर मोहम्मद आसिफ तिला धोका देत आहे, तेव्हा तिने त्याच्यामागे प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा सिसेमिरा लावला होता. अविश्वासातून असुरक्षितताबॉलिवूड कलाकारांमध्ये एकमेकांप्रती वाढत असलेल्या अविश्वातूनच असे प्रकार समोर येत आहेत. गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास कित्येक वर्षे सुखा-समाधानाने संसार करूनही अनेक दाम्पत्य विभक्त होताना दिसत आहेत. एकमेकांप्रती अविश्वास आणि त्यातून निर्माण झालेल्या असुरक्षिततेमुळेच सेलिब्रिटी आपल्या जिवाभावाच्या व्यक्तिंपासून दूर जाणे पसंत करीत आहेत. हृतिक-सुजैन, मलाइका-अरबाज, फरहान-अधुना, करिश्मा-संजय कपूर हे त्याचेच उदाहरण सांगता येईल. तर अर्जुन-मेहर जेसिया आपल्यातील नाते टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर ‘साथ जिने मरणे की कसमे’ खाणारे बरेचसे कलाकार आपल्या जोडीदाराशी ब्रेकअप करीत आहेत.